पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:08 IST2021-07-11T04:08:52+5:302021-07-11T04:08:52+5:30

पुणे : कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी बोलविलेल्या तरुणावर चाकूने पाठीवर वार करीत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ...

Attempted murder out of prejudice | पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून खुनाचा प्रयत्न

पुणे : कोणत्यातरी कारणावरून बाचाबाची झाल्यानंतर चर्चा करण्यासाठी बोलविलेल्या तरुणावर चाकूने पाठीवर वार करीत तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी, चंदनगर पोलिसांनी धीरज सपाटे (वय २२, रा. खराडी रोड) याला अटक केली आहे. तर मयूर मनोज झोडगे (वय २०, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) असे वार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मयूर व आरोपी धीरज या दोघांत दोन दिवसांपूर्वी कोणत्यातरी कारणातून भांडणे झाली. त्यामुळे धीरज याने मयूरला चर्चा करण्यासाठी येथील रिलायन्स मार्ट समोर खराडी येथे बोलावले होते. त्यावेळी त्याने शिवीगाळ करत खिशातून चाकू काढून मयूरच्या छातीवर वार करण्याचा प्रयत्न केला. वेळीच हा प्रकार लक्षात आल्यानंतर मयूरने तेथून पळ काढला. मात्र धीरजने त्याच्या पाठीवर वार केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

---------------------------------------

Web Title: Attempted murder out of prejudice