पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:12 IST2021-09-24T04:12:30+5:302021-09-24T04:12:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्वीच्या भांडणातून धारधार शस्त्राने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सहकारनगरमधील ...

Attempted murder by attacking a young man out of prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न

पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करून खुनाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्वीच्या भांडणातून धारधार शस्त्राने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना सहकारनगरमधील बालाजीनगर येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

आतिश शिवाजी कांबळे (वय २७, रा. तळजाई वसाहत) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याची आई कलावती कांबळे (५०) यांनी फिर्याद दिली आहे.

आतिश कांबळे यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. बुधवारी तो सायकल दुरुस्तीचे काम करत होता. त्यावेळी पूर्वीच्या भांडणातून आरोपींनी आतिश कांबळे याला धारधार हत्याराने मारहाण केली. मारहाणीत आतिश जखमी झाला आहे.

सहकारनगर पोलिसांनी साहिल बळीराम पाटोळे (वय २०, रा. तळजाई वसाहत), संकेत चव्हाण व अमोल पवार (रा. तळजाई वसाहत, पद्मावती) यांच्यावर गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास करीत असताना तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व त्यांचे सहकारी शोध घेत होते. पोलीस अंमलदार सागर शिंदे व प्रदीप बेडीस्कर यांना हे आरोपी तावरे कॉलनीत लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तावरे कॉलनीत सापळा रचून त्यांना पकडले. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत केला आहे.

--

Web Title: Attempted murder by attacking a young man out of prejudice