पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करुन खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:12 IST2021-07-27T04:12:33+5:302021-07-27T04:12:33+5:30
पुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वारजे पोलिसांनी ...

पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार करुन खुनाचा प्रयत्न
पुणे : किरकोळ कारणावरुन झालेल्या वादाच्या रागातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वारजे पोलिसांनी अटक केली.
वैभव उर्फ पप्या ऊकरे (वय ३०, रा. वडारवस्ती कर्वेनगर), सुरज पवार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी संजय उर्फ सुरज पुजारी (वय ३०, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे येथील उड्डाण पुल चौकात रविवारी सायंकाळी साडेपाच्या सुमारास घडली.
फिर्यादी पुजारी यांची चहाची गाडी आहे. त्या गाडीवर अजय नावाचा मुलगा काम करतो. त्यावरून आरोपी वैभव आणि फिर्यादीत वाद झाले असता, दोघांनी फिर्यादींचे वडील व अजय या दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादींना जीवे मारण्याच्या हेतूने दगड आणि लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक होळकर करीत आहेत.