पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांवर वार करून खुनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST2021-07-26T04:09:01+5:302021-07-26T04:09:01+5:30

पुणे : खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ४ जणांच्या टोळक्याने पालघनने वार करून तरुणाला जबर जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी ...

Attempted murder by attacking both for refusing to pay | पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांवर वार करून खुनाचा प्रयत्न

पैसे देण्यास नकार दिल्याने दोघांवर वार करून खुनाचा प्रयत्न

पुणे : खर्चासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ४ जणांच्या टोळक्याने पालघनने वार करून तरुणाला जबर जखमी केले. त्याला सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राच्या डोक्यात वार करून खुनाचा प्रयत्न केला.

याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी शुभम रामभाऊ टिकोळे (वय २५, रा. कुंजीरवाडा, कोंढवा) याला अटक केली आहे. आकाश उणेचा व त्याच्या दोन मित्रांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोंढव्यातील स्मशानभूमीमधील पारावर मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली.

याप्रकरणी गणेश शहादेव घुगे (वय २१, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. घुगे यांचा मित्र संतोष परदेशी याच्याकडे आकाश उणेचा याने खर्चासाठी पैसे मागितले होते. त्याला परदेशी याने नकार दिला होता. त्याचा संताप मनात ठेवून आकाश उणेचा व त्याच्या दोन मित्रांनी संतोष याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी त्याला सोडविण्यासाठी गेले असताना उणेचा याने पालघनने त्यांच्या डोक्यात वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. संतोष परदेशी यांच्यावरही पालघनने वार करुन जबर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक बर्गे तपास करीत आहेत.

Web Title: Attempted murder by attacking both for refusing to pay