युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा अटकेत
By Admin | Updated: June 23, 2014 00:53 IST2014-06-23T00:53:02+5:302014-06-23T00:53:02+5:30
लग्न करण्यासाठी बळजबरी करीत कोयत्याच्या धाकाने युवतीचे अपहरण करून तिला पळवून नेत असताना पोलिसांनी तरुणाला अटक केली

युवतीच्या अपहरणाचा प्रयत्न करणारा अटकेत
पुणे : लग्न करण्यासाठी बळजबरी करीत कोयत्याच्या धाकाने युवतीचे अपहरण करून तिला पळवून नेत असताना पोलिसांनी तरुणाला अटक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अफ्ताफ इकबाल पठाण ऊर्फ बाचक्या (वय २५, रा. अप्पा टिंगरे चाळ, धानोरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या मामाने फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी त्याच्या मामासह महाबळेश्वरला जाण्यासाठी पुणे बस स्थानकामध्ये गेली होती. त्यांचा पाठलाग करीत आलेल्या आरोपीने त्याच्या साथीदारासह या मुलीच्या गळ्याला कोयता लावला. त्यांना जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून घरी चलण्याची जबरदस्ती केली.
तसेच, या मुलीचा हात पकडून माझ्याशी लग्न कर, तुला भरपूर पैसे देतो. जर माझ्यासोबत आली नाहीस, तर कापून टाकीन, अशी धमकी दिली. त्या वेळी या मुलीच्या मामाने पोलिसांना फोन करून माहिती दिल्यावर पोलिसांनी रिक्षाचा पाठलाग करून आरोपीला अटक केली.