शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भोरमधील धक्कादायक प्रकार! जमिनीच्या वादातून शेतकरी महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 19:48 IST

आरोपीने अत्यंत शिताफीने रचला होता प्लॅन

नसरापूर : भोर तालुक्यातील भांबवडे येथील शेतकरी महिलेला शेतातच विजेच्या प्रवाहद्वारे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत नसरापूर येथील किकवी राजगड पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. हिराबाई  दत्तात्रय कापरे (वय ५८) असे ज्येष्ठ महिलेचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी विजय निवृत्ती सुर्वे (वय ३८) याला राजगड पोलिसांनी अटक केली आहे. 

याबाबत राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, भांबवडे (ता. भोर) येथील हिराबाई कापरे यांच्या दिराकडून विजय सुर्वे यांनी दिड गुंठा जमीन खरेदी केली आहे. परंतु शेतजमीन आणि विहीर याबाबत वाद सुरू असून त्याचा खटला न्यायालयात सुरू आहे. दि.१८ रोजी विजय सुर्वे यांनी हिराबाई यांना तुम्ही मला पाणी दिले नाही. तर मी तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यानंतर हिराबाई यांचे पती शेतात ज्वारीला पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना विजय सुर्वे हे लाईटच्या खांबा जवळ काहीतरी करत असल्याचे आढळून आले.  मात्र कापरे नवरा बायको शेतीला पाणी देण्याच्या कामात असल्याने त्यांनी सुर्वे काही तरी विपरीत करत असल्याचे पाहूनही त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर हिराबाई या शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या. मात्र काही ज्वारी भिजवत त्या पुढच्या चाऱ्यात त्यांनी पाऊल टाकले तेव्हा त्यांना विजेचा जोरात झटका बसला. गंजलेली तार इथे कशी आली हे पाहण्यासाठी त्या पुढे गेल्या. तर त्यांना विजेच्या खांबावर आकडा टाकलेला दिसला. खांबावरून ती तार ज्वारीच्या शेतापर्यंत आणलेल्याचे निदर्शनास आले आहे. शॉक लागल्यानंतर नातेवाईक व वायरमन यांनी पाहणी केली असता सरीमधील वायर ही शेजारी असलेल्या उसाच्या शेतातील खांबावरून आकडा टाकून ती लपवत-लपवत फिर्यादीच्या ज्वारी पाणी देण्याच्या ठिकाणापर्यंत आणून जोडली असल्याचे उघड झाले होते.

त्यामुळे त्यांनी घटनेची शहानिशा केल्यानंतर  जवळ असलेल्या किकवी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावल्यानंतर सुर्वे याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच हे कृत्य आपणच केल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगाव, पोलिस कर्मचारी व महावितरणाचे कर्मचारी यांनी पाहणी करून पंचनामा केला.पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

टॅग्स :bhor-acभोरFarmerशेतकरीWomenमहिलाPoliceपोलिस