शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह महिला शिपायाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; जेलरला अटक

By विवेक भुसे | Updated: August 15, 2023 12:46 IST

तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे...

पुणे : कारागृह महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या जेलरने गुन्हा मागे घेण्यासाठी वारंवार फोन करुन महिलेच्या घरी जाऊन तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

येरवडा पोलिसांनी वरिष्ठ जेलर योगेश भास्करराव पाटील (वय ५२, रा. जेलर बंगला, जेल वसाहत, कोल्हापूर) याला अटक केली आहे. याबाबत एका ३९ वर्षाच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कारागृह शिपाई म्हणून काम करतात. त्यांनी आरोपी योगेश पाटील याच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल आहे. पाटील फिर्यादी यांना वारंवार फोन करुन तो गुन्हा मागे घे व माझ्याशी बोल, मी तुझ्याशिवाय जगु शकत नाही, असे बोलत असे. सोमवारी १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी या कामावरुन घरी येत असताना त्याने फियांदी यांना गाठले. मला माहिती आहे तू भाड्याचे घरात राहतेस. आधीच तुझ्या इज्जतीची थु थु झाली आहे. तुला इथे लोक राहू देणार नाहीत. माझ्याबरोबर शांत चल, असे बोलून फिर्यादीच्या घरी आला.

फिर्यादीचे घरातील वॉशिग मशीन घेऊन गेला. काही वेळाने परत आला तेव्हा त्याच्या हातात पेट्रोलने भरलेली प्लॉस्टिकची बाटली होती. तू माझी झाली नाही तर मी तुला कोणाचीच होऊ देणार नाही, असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर पेट्रोल टाकून काड्याची पेटी काढून तिने पेटविण्याचा प्रयत्न करु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला धक्का देऊन आतील खोलीत जाऊन दरवाजा लावून घेऊन स्वत:चा जीव वाचविला आहे. पोलिसांनी या जेलरला अटक केली असून पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडArrestअटक