शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भरदिवसा पेट्रोल पंप व्यवस्थापकावर पिस्तूल रोखून रोकड लुटण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 14:44 IST

बारामती शहरातील धक्कादायक प्रकार...

बारामती (पुणे) : बारामतीतील पाटस रस्त्यावरील कृष्णा पेट्रोलपंपाच्या पेट्रोल पंपाची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी दुचाकीवर निघालेल्या पंप व्यवस्थापकाला अडवून लुटीचा प्रयत्न केला. हा धक्कादायक प्रकार बारामती शहरात सोमवारी (दि. ७) भरदिवसा १२ च्या दरम्यान घडला. पिस्तूल रोखत त्यांच्याजवळील पैशांची बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी केला. या घटनेत पंपाचे व्यवस्थापक मयुर शिंदे (वय ३२) हे गंभीर जखमी झाले. शिंदे यांनी धाडसाने  विरोध केल्याने दोघा चोरट्यांवर ही रोकड न घेताच तेथून पसार होण्याची वेळ आली.

सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता नेहमीप्रमाणे शिंदे यांनी पेट्रोलपंपावरील रक्कम घेत ती भरण्यासाठी ते दुचाकीवरून शहरातील बँकेच्या  दिशेने निघाले. यावेळी अचानक स्प्लेंडर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यांच्याकडील रक्कम असणारी बॅग हिसका मारून पळवून नेण्याचा प्रयत्न  केला. परंतु व्यवस्थापक शिंदे यांनी ही बॅग धाडसाने पोटाखाली दाबून ठेवली. बॅग हाती मिळत नसल्याचे लक्षात येताच त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले. तरीही शिंदे यांनी पैशांची  सोडली नाही. चोरट्यांना बॅग मिळू नये, यासाठी धोका पत्करत विरोध केला. यावेळी चोरट्यांनी त्यांना पिस्तुल रोखत धमकाविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देखील पैशांची बॅग शिंदे यांनी सोडली नाही. त्यामुळे त्यांना पिस्तुलाच्या मुठीने मारहाण करण्यात आली. त्यात शिंदे गंभीर जखमी झाले. त्यावेळी येथील मोहिते वस्तीवरील मुले धावून आली. यावेळी दुचाकीवरील दोघे आणि पुढे दुचाकीवर थांबलेले दोघेजण पसार झाले.

यावेळी उपस्थित युवकांनी दिपक गुजर यांना संपर्क साधत या घटनेची माहिती दिली. दिपक गुजर यांनी तातडीने शिंदे यांना उपचारासाठी येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांना पाच ते सहा टाके पडले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बारामतीतील ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या मालकीचा हा पेट्रोलपंप आहे. यासंबंधी गुजर म्हणाले, शनिवार आणि रविवार दोन दिवस बँक बंद असल्याने आजच्या भरण्याबाबत संबंधित व्यक्तीला माहिती असण्याची शक्यता आहे. पाळत ठेऊन हे काम करण्यात आले. हे काम माहितीतील व्यक्तीने केल्याची शक्यता ज्येष्ठ नगरसेवक गुजर यांनी व्यक्त केली आहे.

शहर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने या ठीकाणी पोहचले.पथकाने घटनास्थळाची पाहणी करीत घटनेची माहिती घेतली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड