शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा प्रयत्न, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:26 IST

केंद्रीय मंत्री गडकरी पुण्यात चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. 

पुणे : अडचणींवर मात करत चांदणी चौकातील पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. आधी हजारो कोटी रुपये खर्च करूनही इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नव्हता. आता पुण्यातील वाहतूक कोंडी सुटण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चांदणी चौकातील पूल उभारण्यासाठी परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पुण्यात ४० हजार कोटींचे कामे पूर्ण केली जाणार आहेत, असं आश्वासन वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. ते पुण्यात चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते. 

गडकरी पुढे म्हणाले, माझ्याकडे पुण्यासाठी हवेतून चालणाऱ्या स्कायबसची कल्पना आहे. माझी अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांना एकदा विनंती आहे की एकदा याचे एकदा प्रेझेंटेशन पाहावे. पुण्यातील वाहतुक कोंडीवर हा चांगला पर्याय होईल. पुण्याच्या विकासासाठी चाळीस हजार कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यामधे दोन- तीन मजली उड्डाणपूल आहेत. पुण्यात हवेतून चालणाऱ्या बस आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गडकरी म्हणाले. तसेच पुण्याला लवकर प्रदुषममुक्त करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हायड्रोजन भविष्य आहे-

पुणे आता अधिक वाढवू नका. हे शहर आता प्रदूषित करु नका. मी लहान असताना माझ्या बहिणीकडे स्वारगेटला राहायला यायचो, तेव्हा पर्वतीवरुन गार हवा यायची. पण आता शहरातील प्रदुषणात वाढ झाली आहे.  मला भारतातून पेट्रोल आणि डिझेल हद्दपार करायचे आहे.  इथेनॉल, मिथेनॉल आणि हायड्रोजन याचा वापर वाढवा. हायड्रोजन हे भविष्य आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करु नका तर कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा. तेच भविष्य आहे, असंही गडकरी म्हणाले. पुण्याला पेट्रोल- डिझेलपासून मुक्त केले तर चाळीस टक्के प्रदुषण कमी होईल. पुण्यातील कचऱ्याचा उपयोग रिंग रोड तयार करण्यासाठी वापरला तर पुण्यात कचरा उरणार नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आज पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, पुणे विमानतळाचे लवकर जमीन अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याच्या विकासात वेगाने भर पडणार आहे. पुरंदरच्या विमानतळासाठी केंद्राच्या सर्व परवानग्या पूर्ण आहेत. त्यामुळे विमानतळाचे काम लवकर सुरू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट हा एकमेव पर्याय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यावर विशेष प्रेम आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे