शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम फोडायचा प्रयत्न फसला अन पोलिसांच्या जाळ्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 19:18 IST

एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा काॅल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाला...

पिंपरी : एटीएम फोडण्याचा प्रयत्न करीत असलेले तीन जणांना अटक करण्यात आली. हिंजवडी पोलिसांनी सतर्कता दाखवत यातील एका आरोपीला घटनास्थळी जेरबंद केले. मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे गुरुवारी (दि. १) रात्री सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

आदित्य भीमराव कांबळे (वय २०, रा. पिंपळे गुरव), विशाल बंडू कारके (वय २२, रा. चिखली), प्रथमेश प्रकाश जाधव (वय २०, रा. पिपळे गुरव) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे गुरुवारी (दि. १) रात्री सव्वादोनच्या सुमारास मुळशी तालुक्यातील म्हाळुंगे येथे एका एटीएम सेंटरमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी हिंजवडी पोलीस ठाण्याचे गस्तीवर असलेले पोलीस नियमित तपासणीसाठी एटीएम सेंटरजवळ आले. पोलीस आल्याचे पाहून आरोपी पळून गेले. त्यावेळी आदित्य कांबळे हा एटीएम सेंटरजवळ अंधारात लपून बसला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने  पोलिसांनी आदित्य कांबळे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी सुरू केली.

दरम्यान, एटीएम सेंटरमध्ये चोरीचा प्रयत्न झाल्याचा काॅल पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मिळाला. त्यानुसार नियंत्रण कक्षाकडून गस्तीवरील हिंजवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर एटीएम सेंटरमध्ये पोलिसांनी तपासणी केली असता, एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले. 

पोलिसांनी आदित्य कांबळे याला पोलीस ठाण्यात नेऊन कसून चौकशी केली. त्याचे साथीदार विशाल कारके व प्रथमेश जाधव याच्यासह दुचाकीवरून येऊन एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे व त्याचे दोन्ही साथीदार पळून गेल्याचे आदित्य कांबळे याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून विशाल कारके आणि प्रथमेश जाधव या दोघांना पिंपळे गुरव येथून अटक केली. ते दोघेही सातारा येथे पळून जण्याच्या तयारीत होते. 

हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, रविंद्र मुदळ, उपनिरीक्षक रमेश पवार, पोलीस कर्मचारी बी. बी. मारणे, बाळकृष्ण शिंदे, नागेश भालेराव, कैलास केंगले, विक्रम कुदळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, सचिन आगलावे, तोसीफ महात, अरूण नरळे, चंद्रकांत गडदे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, दत्ता शिंदे, सागर पंडीत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी