शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याचा कळस चोरीचा प्रयत्न सतर्कतेमुळे फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 01:40 IST

चोरांची टोळी : दोन सुरक्षा रक्षक व दोन भक्तांना मारहाण

आणे : जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध खंडोबा देवस्थानांपैकी एक व असंख्य खंडोबा भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नळावणे येथील कुलस्वामी खंडोबा मंदिराच्या सोन्याच्या कळसाच्या चोरीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला.

नळावणे येथील श्री खंडोबा मंदिरावर ५१ तोळे सोन्याचा मुलामा असलेला कळस आहे. नुकत्याच झालेल्या चंपाषष्टीला त्याचा बारावा वर्धापन दिन साजरा झाला. मंदिरात देवाचा चांदीचा मुखवटा, चांदीच्या पादुका व चांदीची पालखी असते. मंगळवारी (दि. १८) रात्री १२.३० च्या सुमारास १२ ते १५ चोरट्यांनी मंदिराच्या सभोवताली असलेल्या तटबंदीवरून उडया मारून मंदिर परिसरात प्रवेश केला. तेथील रात्रपाळीचे दोन सुरक्षारक्षक व अन्य दोन खंडोबा भक्तांना बेदम मारहाण करून त्यांचे हातपाय बांधले. तेथे राखणीसाठी असलेल्या दोन श्वानांना मारहाण करून कोंडून ठेवले. मंदिर परिसरात असलेल्या १४ सी.सी. टीव्ही कॅमेऱ्यांच्या वायर कापून टाकल्या. मंदिराला असलेल्या दोन्ही दरवाज्यांची कुलपे तोडून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. तेथील चांदीच्या पादुका व चांदीचा मुखवटा घेऊन तेथील इतर साहित्य अस्ताव्यस्त केले. तसेच मंदिराच्या मागच्या बाजूने लांब काठीच्या सहाय्याने कळसावर हुक टाकून त्याला नायलॉनच्या दोरीची शिडी बांधली.शिडीवरून कळसाकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना तुकाराम गगे या सुरक्षारक्षकाने स्वत:ची सुटका करून घेऊन सायरन वाजवला. त्या आवाजाने अनेक ग्रामस्थांनी मंदिराच्या दिशेने धाव घेतली. अचानक झालेला सायरनचा आवाज आणि मंदिराच्या दिशेने येणारा ग्रामस्थांचा लोंढा पाहून चोरट्यांनी देवाचा मुखवटा तटबंदीजवळ टाकून पोबारा केला.जखमी उपचारासाठी रुग्णालयात दाखलमारहाण झालेले सुरक्षारक्षक तुकाराम गगे व खंडोबा भक्त चिवा गगे आणि अमित शिंदे यांना आळेफाटा येथे रुग्णालयात दाखल केले आहे. दुसरे सुरक्षारक्षक गोपीनाथ शिंदे यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर हे करीत असून पोलिस श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केल्याचे देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब गगे यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिर