महसूल पथकाला धमकाविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 21, 2015 00:40 IST2015-12-21T00:40:38+5:302015-12-21T00:40:38+5:30
वाळूचोरांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या भरारी पथकास धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या करमाळा - सोलापूर येथील वाळूमाफियास इंदापूर

महसूल पथकाला धमकाविण्याचा प्रयत्न
इंदापूर : वाळूचोरांविरुद्ध कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या भरारी पथकास धमकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या करमाळा - सोलापूर येथील वाळूमाफियास इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी दिली.
येवले म्हणाले की, मागील काही काळापासून वाळूमाफियांवरील कारवाईची मोहीम आपण अधिक तीव्र केली आहे. या दोन दिवसांत वाळूचोरी करणाऱ्या २३ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. आज दुपारपासून महसूल विभागाचे भरारी पथक, पोलीस कर्मचारी वैभव भापकर, गणेश पवार यांच्यासह ही कारवाई करत आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ३० ते ४० वाळू व्यावसायिक जमाव करुन स्वप्नतारा हॉटेल जवळ आले. त्यांनी धमकावणे सुरु केले. वातावरण तंग झाले. त्यामुळे आपण इंदापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे तेथे आले. वाळूमाफियांचा म्होरक्या गणेश अनिरुद्ध साळुंखे याला पोलिसांच्या ताब्यात दिले.