राजकारणविरहित विकासात्मक काम करण्याचा प्रयत्न : माणिक गावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:08 IST2021-07-18T04:08:28+5:302021-07-18T04:08:28+5:30
गावडे म्हणाल्या, की मंचर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या व समाजहिताच्या कामासाठी नेहमी आग्रही राहिले आहे व त्यासाठी माझा पाठिंबा ...

राजकारणविरहित विकासात्मक काम करण्याचा प्रयत्न : माणिक गावडे
गावडे म्हणाल्या, की मंचर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासाच्या व समाजहिताच्या कामासाठी नेहमी आग्रही राहिले आहे व त्यासाठी माझा पाठिंबा राहिला आहे.सामाजिक जीवनात काम करत असताना कुठल्याही चुकीच्या निर्णयात मी सामील झाले नाही व चुकीच्या निर्णयाची पाठराखणसुद्धा केलेली नाही.
मंचर शहराचा विकास करण्यासाठी वाढते नागरिकीकरण विचारात घेता धोरणात्मक निर्णय होऊन आर्थिक निधी व नियोजनाची आवश्यकता आहे. कोरोनाकाळात विकास निधी खर्च करता न आल्याने कदाचित विकास खुंटला असेल किंवा काही कामे मार्गी लागली नसतील तरी भविष्यात ती कामे पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मंचर शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध होत आहे.भविष्यात वळसे-पाटील यांच्या माध्यमातून विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी माझा प्रयत्न राहील. सर्व मंचर ग्रामस्थांना नम्र विनंती आहे की, आपली थकीत घरपट्टी,पाणीपट्टी भरून ग्रामपंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन गावडे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.