लवळेफाटा येथील एटीएमचे शटर फोडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:07 IST2020-12-28T04:07:17+5:302020-12-28T04:07:17+5:30

पुणे : लवळे फाटा (ता.मुळशी) येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएमचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पौड पोलिसांनी ...

Attempt to break the shutters of ATM at Lovelephata | लवळेफाटा येथील एटीएमचे शटर फोडण्याचा प्रयत्न

लवळेफाटा येथील एटीएमचे शटर फोडण्याचा प्रयत्न

पुणे : लवळे फाटा (ता.मुळशी) येथील बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएमचे शटर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पौड पोलिसांनी अटक केली. तर यामध्ये

ऋषिकेश तेलंगे (वय१९, रा. पिरंगुट) अविनाश पवार (वय १९, रा. पिरंगुट, मूळ रा. श्रीनगर, जि. नांदेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या एटीएमचे शटर हे रात्री दीडच्या सुमारास दोन व्यक्ती फोडण्याचा प्रयत्न करीत होते. याबाबतचा संदेश नियंत्रण कक्षातून पौड पोलिसांना आला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

पोलिस आल्याचे पाहताच दोघे जण पळून जात असताना पाठलाग करून पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे, सहाय्यक पोलीस फौजदार संतोष कुंभार, पोलीस जवान नंदकुमार गडाळे, पोलीस अंमलदार तुषार भोईटे, होमगार्ड अरुण जाधव व कारंजकर यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Attempt to break the shutters of ATM at Lovelephata