युवा सेनेच्या शहरप्रमुखांचे हल्लेखोर अखेर ताब्यात
By Admin | Updated: November 7, 2014 05:25 IST2014-11-07T05:25:10+5:302014-11-07T05:25:10+5:30
शिवसेना युवा सेनेचे शहरप्रमुख नितीन गोविंद भुजबळ (वय ३२, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगावशेरी) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन जणांना येरवडा पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेतले.

युवा सेनेच्या शहरप्रमुखांचे हल्लेखोर अखेर ताब्यात
पुणे : शिवसेना युवा सेनेचे शहरप्रमुख नितीन गोविंद भुजबळ (वय ३२, रा. ब्रह्मा सनसिटी, वडगावशेरी) यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन जणांना येरवडा पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. हा हल्ला व्यावसायिक वादामधून झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आल्याचे पोलीस ठाण्याच्या सूत्रांनी सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांपैकी एका तरुणाचे हॉटेल होते. हे हॉटेल काही दिवसांपूर्वी बंद पाडण्यात आले होते. या कारणावरूनच भुजबळ यांच्यावर त्याने हल्ला केला. भुजबळ यांच्यावर बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास हल्ला झाल्यानंतर उपायुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विलास सोंडे यांनी प्रकरणाच्या तपासाला तातडीने सुरुवात केली होती.
आरोपीने साथीदारांसह भुजबळ यांच्यावर पाळत ठेवली होती. चालक सुनीलकुमार सातलिंगप्पा हरळय्या (वय २१, रा. विमाननगर) याच्यासह त्यांच्यावर हल्ला करण्यात
आला. भुजबळ यांच्या डोक्यावर,
हात व पायावर वार केले
होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हा हल्ला व्यावसायिक वादामधून
झाल्याचा कयास सुरुवातीलाच बांधला होता.(प्रतिनिधी)