औकात काढल्याने मित्राकडून चाकूने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST2021-06-04T04:09:02+5:302021-06-04T04:09:02+5:30

म्हटल्याने मित्रावर चाकू हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितल्यावर औकात ...

Attacked by a friend with a knife | औकात काढल्याने मित्राकडून चाकूने हल्ला

औकात काढल्याने मित्राकडून चाकूने हल्ला

म्हटल्याने मित्रावर चाकू हल्ला करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पेट्रोल भरण्यासाठी पैसे मागितल्यावर औकात काढल्याने चिडलेल्या तरुणाने मित्रावर चाकूने हल्ला करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

समर्थ पोलिसांनी फजल अब्दुल रशिद मुल्ला (रा. ब्रम्हा इस्टेटमागे, कोंढवा) याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी फैजान अब्दुलगफूर शेख (वय २५, रा. नुराणी कब्रस्थानमागे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना भवानी पेठेत बुधवारी पहाटे साडेचार वाजता घडली.

फिर्यादी आणि आरोपी हे मित्र आहेत. भवानी पेठेत पहाटे दोघे आले असताना आरोपीच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने त्याने फिर्यादीकडे पैसे मागितले. तेव्हा फिर्यादीने ‘‘ऐ तेरी औकात है क्या, तेरे पास गाडी में पेट्रोल डालने के लिए पैसे नही और तू क्या तेरी औरत को संभालेगा,’’असे म्हटले. त्यावरुन चिडलेल्या आरोपीने ‘‘मैं तुझे अभी जिंदा नही छोडूंगा’’ असे म्हणून त्याच्याकडील चाकूने फिर्यादीच्या मानेवर वार करून जबर जखमी केले. समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Attacked by a friend with a knife