वाळूमाफियांचा पथकावर हल्ला
By Admin | Updated: March 21, 2016 00:40 IST2016-03-21T00:40:37+5:302016-03-21T00:40:37+5:30
पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या माफियांनी महसूल पथकाच्या अधिकारीवर्गाला दमदाटी करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला

वाळूमाफियांचा पथकावर हल्ला
कुरकुंभ : पेडगाव (ता. दौंड) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्या माफियांनी महसूल पथकाच्या अधिकारीवर्गाला दमदाटी करीत त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
अवैध उपशाबाबत वारंवार कारवाई होऊनदेखील वाळूउपसा बंद होत नाही. त्यामुळे दौंडचे तहसीलदार उत्तम दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विविध तलाठी व कर्मचारी यांचे पथक तयार करून नदीपात्राच्या परिसरात शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास गस्त घालत असताना पेडगाव परिसरात नदीपात्रात ८ ते १० जेसीबीने वाळूउपसा होत असल्याचे लक्षात येताच जेसीबी व अन्य वाहने ताब्यात घेतली. मात्र, जेसीबीचालक पळून गेले. यामधील एक चालक सागर लांडगे यास ताब्यात घेतले.
चालकाने दिलेल्या माहितीनुसार, जेसीबीचा मालक युवराज शिंदे हा आहे. मात्र, काही वेळांतच शिंदे व त्यांचे साथीदार निहाल पिरजादे, शाहनूर सय्यद, इरफान काझी,
मन्सूर पिरजादे, इरफान पिरजादे, शकूर शेख, अन्सर शेख, अकबर आत्तार, पप्पू कोथिंबिरे, दीपक नवले, सर्व
राहणार पेडगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर यांनी येऊन
शासकीय अधिकारीवर्गाला दमदाटी करून त्यांच्या ताब्यातील जेसीबी व इतर वाहने पळवून घेऊन गेले.
त्यामुळे त्यांच्यावर दौंड येथील पोलिसांत शासकीय कामात अडथळा आणणे व दमदाटी करणे इ.कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.