शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: खराडीत अतिक्रमण पथकावर हल्ला; पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 21:00 IST

जमाव गोळा करून अतिक्रमण पथकावर हल्ला...

चंदननगर (पुणे) : नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खराडीत अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाई करत असताना विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना (दि. 25) घडली. अतिक्रमण निरिक्षक भिमाजी शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडीतील स्विट इंडीया चौकातील गंगा कांन्स्टीला येथे अनधिकृत भाजी विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात रस्ता व्यापल्याने वाहनचालकांना नागरीकांना नाहक त्रास होत असल्याने मंगळवारी कारवाईसाठी दोन निरिक्षक, बिगारी, सुरक्षा रक्षक कारवाईसाठी गेले असता अनधिकृत भाजी विक्रेत्यांनी जमाव गोळा करून अतिक्रमण पथकावर हल्ला करून मारहाण केली.

याबाबत चंदननगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे (वय 24, रा. बोपखेल) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बाळासाहेब किसन गायसमुद्रे (वय-49), सुमित सुनील गिरी (वय 21), शेखर बाळासाहेब गायसमुद्रे (वय-21), सुनील बंडू गिरी (वय-45), गणेश बाळासाहेब गायसमुद्रे (वय- 19, सर्व राहणार खराडी) यांना अटक करण्यात आली आहे.

नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमण निरीक्षक भिमाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कुणाल मुंडे आणि त्यांचे इतर दहा ते बारा सहकारी मिळून नगर रस्ता परिसरातील वडगाव शेरी विमाननगर आणि खराडी येथील पदपथावर अनधिकृतित्या बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करीत होते. खराडी येथील स्वीट इंडिया चौकात अतिक्रमण विरोधी पथक दाखल झाल्यानंतर येथे पदपथावर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संशयित आरोपींनी कारवाईला विरोध करीत स्वतःच्या हाताने भाजीपाला रस्त्यावर फेकला. त्यानंतर अतिक्रमण पथकावर हल्ला करीत मारहाण केली.

घटनेची माहिती पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रमुखांना आणि पुणे महानगरपालिका आयुक्तांना समजल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. खराडी येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना आमच्या सोबत पोलीस बंदोबस्त नव्हता. तसेच महिला कर्मचारीही आमच्या सोबत नाहीत. त्यामुळे अनधिकृत विक्रेत्यांकडून पुणे महानगरपालिकेच्या पथकावर हल्ला करण्याच्या, दमदाटी करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEnchroachmentअतिक्रमण