नगराध्यक्ष थिगळे यांच्या कार्यालयावर हल्ला

By Admin | Updated: April 1, 2017 00:10 IST2017-04-01T00:10:11+5:302017-04-01T00:10:11+5:30

राजगुरुनगरचे नगराध्यक्ष बापू थिगळे यांच्या कार्यालयावर १५ ते २० तरुणांनी हल्ला करून कार्यालयाची नासधूस केली

The attack on the office of the head of town, Theigale | नगराध्यक्ष थिगळे यांच्या कार्यालयावर हल्ला

नगराध्यक्ष थिगळे यांच्या कार्यालयावर हल्ला

राजगुरुनगर : राजगुरुनगरचे नगराध्यक्ष बापू थिगळे यांच्या कार्यालयावर १५ ते २० तरुणांनी हल्ला करून कार्यालयाची नासधूस केली. या हल्ल्यामध्ये थिगळे यांचा भाचा जखमी झाला आहे. केबलच्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
थिगळे यांचे पुणे-नाशिक महामार्गावर थिगळस्थळ येथे कार्यालय आहे. त्यांचा भाचा अभिषेक लक्ष्मण गोरडे कार्यालयाचे कामकाज पाहतो. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन मोटारी व मोटारसायकलींवरून १५ ते २० तरुण तेथे आले आणि त्यांनी कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात अभिषेक जखमी झाला. आजूबाजूचे रहिवासी व तरुण तेथे जमा झाले व पोलिसांना फोन करून कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन काही जणांना पकडले, तर काही हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, केबल व्यवसायातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर व्यक्त केली आहे. (वार्ताहर)

Web Title: The attack on the office of the head of town, Theigale