शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जेएनयूवरील हल्ला अभाविपने केलेला नाही; पुरावे असतील समोर आणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 20:44 IST

विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी.

ठळक मुद्दे अभाविपच्या पुणे महानगरमंत्रीचे स्पष्टीकरणज्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. त्यातील २५ विद्यार्थी हे अभाविपचे

पुणे : जेएनयूवरील हल्ला हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेला नाही. जर केला असेल तर त्याचे पुरावे द्यावेत आणि ते दिल्यास न्यायालयासमोर त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशा रोखठोक शब्दांत अभाविपचे पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे यांनी विरोधकांना सुनावले.जेएनयूवरील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यात अभाविपचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. एफटीआयआयच्या विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यानेही सात वर्षांपूर्वी एका लघुपटाच्या स्क्रिनिंगवरून विद्यार्थ्यांवर हल्लाबोल केला होता, याचा पुनरूच्चार केला आहे. यापार्श्वभूमीवर अनिल ठोंबरे यांच्याशी 'लोकमत'ने संवाद साधला असता ते म्हणाले २०१३ मधला संदर्भ जर एफटीआयआयचे विद्यार्थी देत असतील तर पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपुरा राज्यांमध्ये रोज ज्या घटना घडत आहेत. २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधल्या अभाविपच्या हल्ले केले गेले.  केरळमध्ये त्यांचा मुख्यमंत्री ज्या मतदारसंघात निवडून आला तिथेही अभाविपच्या कार्यकर्त्यावर हल्लाकार्यकर्त्यांवर  झाला. आज जेएनयूमध्ये आमच्या राष्ट्रीय मंत्री असलेल्या विद्यार्थ्यांवर देखील हल्ला झाला आहे. त्याचे पुरावे देखील आहेत. हिंसाचार करण्याची वृत्ती कुणाची राहिली आहे. हे सर्वांना माहिती आहे. आपल्या देशाने माओवाद, नक्षलवाद कधीही स्वीकारलेला नाहीये. त्याला समर्थन करणारे कोण आहेत हे सर्वजण जाणतात. मुळात जेएनयूवरील हल्ला हा पूर्वनियोजित होता. डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी आणि संघटनेच्या अध्यक्षा आयिशा घोष यांच्यासह ३५० कार्यकर्ते व अभाविपचे कार्यकर्ते हॉस्टेलच्या कँम्प्सबाहेर  होते. त्यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. विद्यापीठांमध्ये जर कुणी असे हल्ले करीत असेल तर त्याची केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी चौकशी करावी. या पूर्वनियोजित कटामध्ये जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. एखादा विशिष्ट अजेंडा घेऊन विद्यापीठांमध्ये हिंसाचार करणे हा त्यांचा एकमेव हेतू आहे. ज्या विद्यार्थ्यांवर हल्ला झाला आहे. त्यातील जे विद्यार्थी एम्स रूग्णालयात अ‍ॅडमिट आहेत. त्यातील २५ विद्यार्थी हे अभाविपचे आहेत. याची चौकशीही करू शकता. त्यामुळे हल्ला करण्याची चौकशी कुणाची राहिली आहे. याची चौकशी करावी आणि त्याची पाळमुळं शोधून काढावी. अभाविप बद्दल न्यायालयासमोर पुरावे आलेले नाहीत किंवा पोलिसांनी रिपोर्ट दिलेला नाहीये. त्यामुळे अभाविपचे नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे ठोंबरे यांनी स्पष्टपणे सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेjnu attackजेएनयू