पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर हल्ला

By Admin | Updated: February 29, 2016 01:15 IST2016-02-29T01:15:35+5:302016-02-29T01:15:35+5:30

तालुक्यातील डिकसळ गावात शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर अज्ञातांनी हल्ला केला.

Attack on four families of Pardi community | पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर हल्ला

पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर हल्ला

इंदापूर : तालुक्यातील डिकसळ गावात शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास पारधी समाजाच्या चार कुटुंबांवर अज्ञातांनी हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे.
प्रल्हाद काळे, गुरुदास काळे, अजय सिंघानिया, गीता काळे, द्रौपदा काळे अशी त्यांची नावे आहेत.
या हल्ल्यात पुरुषांचे हात-पाय मोडले आहेत. तिघेही
अत्यावस्थ आहेत.
हल्लेखोरांनी अपंग महिलेलाही सोडले नाही. अचानक झालेल्या हल्ल्याने या ठिकाणी राहत असलेल्या सर्वच पारधी समाजाच्या महिला सैरावैरा धावत सुटल्या.
ही सर्व कुटुंबे मासेमारी व्यवसाय करतात. डिकसळमधील भीमा नदीच्या काठावर लहान झोपड्या करून राहतात. त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याने सर्वजण घाबरले आहेत. हल्लेखोरांनी लूट केल्याने हा दरोड्याचा प्रकार असल्याचे जखमींनी सांगितले.
जखमींना भिगवण येथील खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अत्यावस्थ जखमींना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: Attack on four families of Pardi community