शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

खराडीतील कोविड रूग्णालयावर समाजकंटकाकडून भ्याड हल्ला; डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 18:01 IST

या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान

ठळक मुद्देचंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी

पुणे : कोरोना काळात रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत यासाठी शहरातील विविध रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. या रुग्णालयांमध्ये डॉक्टर,कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहे. या कोविड केअर रुग्णालयांचा अनेकांना चांगला फायदा होत आहे. मात्र,खराडीतील रायझिंग मेडिकेअर या कोविड रुग्णालयावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला करत दगडफेक केली आहे. या हल्ल्यात रुग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑक्सिजन सिलेंडची वाहतूक करताना त्याचा आवाज होतो म्हणून काही स्थानिकांनी हॉस्पिटलवर सोमवारी ( दि. १८) दुपारी हा भ्याड हल्ला केला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.      खराडीतील रायझिंग मेडिकेअर हे कोविड रुग्णालय असल्यामुळे तेथे ऑक्सिजन सपोर्टची सतत गरज लागत असते.या ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करताना आवाज होतो म्हणून काही स्थानिकांनी हॉस्पिटलवर दगडफेक केली. तसेच तिथे कोविड ड्युटीवर काम करणाऱ्या डॉक्टर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांच्या जिविताला धोका उत्पन्न केला. याबाबत वडगावशेरी चंदननगर खराडी डॉक्टर्स असोसिएशनच्या तर्फे तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत चंदननगर पोलिसांची भेट घेऊन आरोपींना अटक करून कारवाई करण्याची मागणी केली.        पोलीस प्रशासनाने संबंधित दोषींवर सुधारित हॉस्पिटल प्रोटेक्शन व पॅनडेमिक कायद्यानुसार तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशी आग्रही भूमिका घेत डॉक्टरांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या कलमानुसार कारवाई व्हावी असे लेखी निवेदन चंदननगर पोलिसांना दिले. यावेळी चंदननगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकरराव खटके यांनी याप्रकरणी दोषींवर योग्य कारवाई करण्यात येईल असे आश्वासन डॉक्टरांच्या प्रतिनिधी मंडळास दिले आहे.          यावेळी चंदननगर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक शंकर खटके,डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ.प्रशांत दौंडकर पाटील,विशाल मुरकुटे,योगेश गायकवाड,संतोषकुमार शिंदे,भाऊसाहेब जाधव,रायझिंग हॉस्पिटलचे डॉ. विनोद भारती,सुमेध गिरी ,सचिन पठारे,नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यावेळी उपस्थित होते.

........................

रूण्यालय सुरक्षा कायदा , आपत्ती व्यववस्थापक कायदा ,साथीचे रोग प्रतिबंदक कायद्या या अंतर्गत दोषी व्यक्तीवर चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.- डॉ.विनोद भारती,रायझिंग हॉस्पिटल

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरPoliceपोलिस