किकवी येथे आचाऱ्यावर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:11 IST2021-09-27T04:11:42+5:302021-09-27T04:11:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर दोन हल्लेकोरांनी किकवी (ता. भोर) येथे एका आचाऱ्यावर हल्ला करत त्याच्या ...

Attack on Acharya at Kikvi | किकवी येथे आचाऱ्यावर वार

किकवी येथे आचाऱ्यावर वार

लोकमत न्यूज नेटवर्क

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावर दोन हल्लेकोरांनी किकवी (ता. भोर) येथे एका आचाऱ्यावर हल्ला करत त्याच्या जवळीक मोबाईल आणि १० हजार रुपये लंपास केले. भगवानदीन शोभाराम सोनी (वय २६,रा. किकवी) असे जखमी झालेल्या आचाऱ्याचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानदीन शोभाराम सोनी हा त्याच्या किकवी येथील मित्राकडे पुणे-सातारा महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरून पायी जात होता. यावेळी दोन तरुणांनी त्याला अडवून पैशाची मागणी केली. त्यावेळी अनुपमने पैसे देण्यास नकार दिला. त्यातील एकाने अनुपम यास पाठीमागून पकडून दुसऱ्याने त्याच्याकडील टोकदार हत्याराने अनुपम यांचे छातीवर तसेच पोटात मारून गंभीर जखमी केले. अनुपमच्या शर्टाच्या खिशातील दहा हजार रुपये व मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेऊन शिरवळ - सातारा बाजूंच्या दिशेने दुचाकीवरून फरार झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.

Web Title: Attack on Acharya at Kikvi