‘ऑलिम्पिक’चे ध्येय खेळाडूंनी ठेवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:20 IST2021-02-21T04:20:24+5:302021-02-21T04:20:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्या सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमधून फक्त विजेतेपदच नव्हे, तर आशियायी तसेच ऑलिम्पिक खेळाचे ध्येय ...

Athletes should aim for the Olympics | ‘ऑलिम्पिक’चे ध्येय खेळाडूंनी ठेवावे

‘ऑलिम्पिक’चे ध्येय खेळाडूंनी ठेवावे

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्या सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धांमधून फक्त विजेतेपदच नव्हे, तर आशियायी तसेच ऑलिम्पिक खेळाचे ध्येय खेळाडूंनी डोळ्यांसमोर ठेवावे, अशी अपेक्षा क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली.

७ ब्लॉक खो-खो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे आयोजित ‘खो-खो’ स्पर्धेस तटकरे यांनी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आधार सोशल ट्रस्टचे अध्यक्ष संतोष चाकणकर, भारतीय असोसिएशनचे महासरचिटणीस बी. आर. यादव, ऑल इंडिया ७ ब्लॉक खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर शिंदे, सावित्री सन्मान फाउंडेशनच्या सेक्रेटरी सोनल कोद्रे, शीतल संतोष चाकणकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यावेळी उपस्थित होते.

प्रत्येक क्रीडा संकुलात भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी खो-खो, कबड्डी, कुस्ती आणि मल्लखांब या खेळांच्या सुविधा असाव्यात, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली. या स्पर्धेत आंध्रप्रदेश, बिहार, दिल्ली, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्र, ओडिशा व उत्तर प्रदेश या आठ राज्यांतील खेळाडू सहभागी झाले आहेत.

Web Title: Athletes should aim for the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.