शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar:...त्यावेळी मात्र केंद्राने इंधन दरवाढ करू नये; अजित पवारांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 17:56 IST

पेट्रोल व डिझेल दर कपातीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, कमी केलेले दर तसेच कमी रहावेत

बारामती : पेट्रोलडिझेल दर कपातीचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे. मात्र, कमी केलेले दर तसेच कमी रहावेत. अन्यथा जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पुन्हा इंधन दर त्याच किंमतीवर आणुन ठेवतील. त्यावेळी इंधन दरवाढ केंद्रांने करू नये, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. सीएनजी गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनचालकांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे त्यांनी पवार यांनी निदर्शनास आणले. यावेळी पवार म्हणाले,  पेट्रोलडिझेल व गॅस सिलेंडर चे दर मोठ्या प्रमाणावर आवाक्याबाहेर गेल्याने जनता हैराण झाली होती. त्यात नाराजीमुळे  मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू झाली होती. आम्ही अर्थसंकल्प सादर करताना गॅस सिलेंडर वरील टॅक्स साडेतेरा टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर आणला. राज्य सरकारने १ हजार कोटी टॅक्स न घेण्याचा निर्णय घेत सीएनजी चे दर कमी केले. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला. सर्वसामान्य सीएनजी वाहन चालक, टॅक्सी व रिक्षा चालक यांना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला होता,असे पवार म्हणाले.

महाराष्ट्रासह देशपातळीवर पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढल्याने जनतेचा सरकारवरील रोष वाढला होता, या पार्श्वभूमीवर आंदोलने सुरू झाली होती, समाज माध्यमातून नागरिक महागाईच्या पार्श्वभूमीवर नाराजी व्यक्त करत होते. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला असावा. कोणतेही सरकार असले तरी गोरगरीब जनतेला संसार चालवायला परवडले पाहिजे, अशी परीस्थिती सरकारने निर्माण करावी,असे पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPetrolपेट्रोलDieselडिझेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण