शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

अखेर हरवलेला श्रेयस सापडला; १० तासांच्या शोधानंतर माळेगाव पोलिसांना आले मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 20:33 IST

सांगवी ( बारामती ) : तिसरीत शिक्षण घेत असणारा मुलगा हरवल्या नंतर त्या मुलाचा अवघ्या दहा तासांत शोध घेण्यात ...

सांगवी (बारामती ) : तिसरीत शिक्षण घेत असणारा मुलगा हरवल्या नंतर त्या मुलाचा अवघ्या दहा तासांत शोध घेण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले आहे.  त्याला पोलिसांनी कुटुंबाच्या स्वाधीन केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अंजनगाव ता. बारामती जि पुणे. येथील संतोष कदम यांचा इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेला मुलगा श्रेयश संतोष कदम (वय ९) हा मंगळवारी (दि.२६) रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आईस मी माझे कडील दोन रुपयाचे किराणा दुकानातून काहीतरी खायला घेऊन येतो असे सांगून निघून गेला होता, परंतु बराच वेळ झाल्यानंतर देखील तो घरी न परतल्यामुळे त्याची आई व बहीण तसेच इतर नातेवाईकांनी त्याचा अंजनगाव या गावात तसेच परिसरात शोध घेतला मात्र श्रेयश सापडला नाही.याबाबत आईने (पुनम संतोष कदम)  श्रेयसचे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केले असल्या बाबतची फिर्याद माळेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 293/2024  भारतीय न्यायसंहिता 2023 चे कलम 137 (2) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी फिर्यादी बाबत नमूद घटनेचे गांभीर्य ओळखून सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर यांच्याकडे सोपवून तात्काळ अपहृत मुलगा श्रेयसचा शोध घेण्यासाठी चार वेगवेगळी तपास पथके तयार करण्यात आली होती.अपहरण झालेल्या श्रेयसचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली होती. त्यानुसार घटनास्थळाच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही गोपनीय माहितीच्या आधारे तपासून सदर मुलाचा शोध पणदरे (ता. बारामती) परिसरात घेण्यात माळेगाव पोलिसांना मोठे यश आले. यानंतर श्रेयसला आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप परत देण्यात आहे. बुधवार (दि.२७) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तो पणदरे सापडला.सदरची कामगिरी माळेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर,देविदास साळवे, तुषार भोर, पोलीस अंमलदार विजय वाघमोडे, राहुल पांढरे,ज्ञानेश्वर मोरे, अमोल वाघमारे, अमोल राऊत, नितीन कांबळे, गणेश खंडागळे, नंदकुमार गव्हाणे, धीरज कांबळे, महिला पोलीस अंमलदार सुनिता पाटील यांनी केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसKidnappingअपहरणBaramatiबारामती