शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune: आळेफाटा येथे बिबट्या थेट इमारतीत घुसला; वनरक्षकासह दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:34 IST

जवळपास सव्वा तासानंतर हा बिबट्या या इमारतीतून बाहेर निघून लगतच्या शेतात पळून गेला....

आळेफाटा (पुणे) :बिबट्याने मानवी वस्तीकडे प्रवेश करणं ही काही नवीन बाब राहिली नाही. पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना बिबट्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. त्यानंतर हा बिबट्या थेट लगतच्या इमारतीमध्ये घुसला. आळेफाटा (ता. जुन्नर) चौकाजवळ मंगळवारी (२६ मार्च) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. जवळपास सव्वा तासानंतर हा बिबट्या या इमारतीतून बाहेर निघून लगतच्या शेतात पळून गेला.

आळेफाटा चौकापासून अवघ्या काही अंतरावर रात्री ९ वाजता हा बिबट्या पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत होता. या वेळी त्याची एका दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार रामजी वर्मा हा जखमी झाला. धडकेनंतर बिबट्या थेट बाजूच्या पांडुरंग नरवडे यांच्या पांडुरंग कृपा या इमारतीमध्ये घुसला. त्यामुळे रहिवाशांची मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी दरवाजे लावून घेतले. त्यानंतर हा बिबट्या जिन्याने थेट टेरेसवर गेला. बिबट्या इमारतीमध्ये घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली.

वन विभागाचे वनरक्षक कैलास भालेराव यांच्यासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. दुसऱ्या बाजूने इमारतीवर चढून त्यांनी बिबट्यास खाली हुसकावले. मात्र बिबट्याने खाली येत असताना पत्र्याच्या शेडवर उडी मारून आश्रय घेतला. जवळपास सव्वा तासानंतर बिबट्या इमारतीतून बाहेर आला व लगतच्या शेतात धूम ठोकली, तेव्हा कुठे रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :leopardबिबट्याPuneपुणे