पवनाथडी जत्रेत ज्योतिषांनी घातली भुरळ

By Admin | Updated: February 4, 2015 00:48 IST2015-02-04T00:48:24+5:302015-02-04T00:48:24+5:30

मुलीच लग्न जमत नाही, पैसाला पैसा लागत नाही, चार चाकीची मोठी अपेक्षा आहे, मनासारखी नोकरी नाही, मुलाबाळांचे प्रश्न सुटतील, मनासारखा जोडीदार मिळत नाही,

Astrologers embarked on the Pyannadi jatra | पवनाथडी जत्रेत ज्योतिषांनी घातली भुरळ

पवनाथडी जत्रेत ज्योतिषांनी घातली भुरळ

पिंपरी : मुलीच लग्न जमत नाही, पैसाला पैसा लागत नाही, चार चाकीची मोठी अपेक्षा आहे, मनासारखी नोकरी नाही, मुलाबाळांचे प्रश्न सुटतील, मनासारखा जोडीदार मिळत नाही, अधिकारी बनायचे स्वप्न अपुरे राहिले आहे, शिक्षणावर लक्ष नाही, मोठं घबाड हाती लागणार आहे, तुमचेच मित्र तुमच्या वाईटावर आहेत. लोकांना तुमचे चांगले पहावत नाही, अपघातामधून बचाव झालेला आहे, मरणाच्या दारातून माघारी आलेला आहात. या सर्व समस्या २ ते ३ महिन्यात सुटतील असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे पवनाथडीतील ज्योतिषी देण्याचा प्रयत्न करत आहेत.
भविष्यात काही संकटे येणार आहेत. गुरू आणि शनीची साडेसाती आहे. भविष्यातील प्रगतीकरिता अंगठीत अमुक राशीचा खडा घाला , गळ्यात अमुक दोरा बांधून घ्या, देवाच्या दर्शनाला जावा, कुलदैवतांचा विसर पडला आहे, हे सर्व भविष्यवाणी वर्तविली जात आहेत. यासाठी फ कत ५० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत.
गळ्यात पंचा, वाढलेली दाढी आणि केसांचा बुचडा, कपाळाला भला मोठा गंध आणि विभूत, डोक्याला फे टा, बंडी आणि धोतर, हातात अंगठ्या आणि गळ्यात माळा व वडीलोपार्जित चालत आलेला व्यवसाय असे चित्र आहे भविष्य सांगणाऱ्या पवनाथडी जत्रेतील हरिभाऊ हिरामण वाईकर यांचे आहे. रहिवासी मूळचे बारामतीचे. बोलण्याची ऐट अशी की, समोरचाही विचारचक्रात गुंतून जातो. बोलण्याच्या ओघात समस्यांना त्रासलेल्या व्यक्ती सर्व काही आपल्या समस्या सांगायला सुरूवात होते. व अशाच प्रकारचा अंदाज घेऊन प्रश्नांची उत्तरे देण्याचे स्वरुप बदलज जाते हे नित्यनियमाचे ठरलेले आहे.
शेवटी ज्योतिषी होऊनच पुन्हा विचारायला सुरूवात करतो की, ’तुमचे प्रश्न काय असतील तर सांगा. तुम्ही बोललात तर तुमच्या मनातील प्रश्न आम्हांला समजतील. तुमच्या ग्रहांची स्थिती सध्या खराब आहे. मी योग्य तो मार्ग सांगतो.’ असे म्हणून नागरिक आपले प्रश्न मांडण्यास सुरूवात करायचे. जोपर्यंत मनातील शंका संपत नाहीत. तोपर्यंत नागरिक हेलपाटे मारायचे थांबत नाहीत. पैसा ही घालवायचा आणि वेळही. निष्पन्न मात्र काही होत नाही.
काही तरूण व सुशिक्षित मंडळी नुसतीच मजा म्हणून भविष्याचा आनंद लुटताना दिसत आहेत. हात दाखवायचे व रेषांचे ज्ञान माहिती करुन घ्यायचे. (प्रतिनिधी)

४पवनाथडी जत्रेत भविष्य पाहणाऱ्या ज्योतिषांना स्टॉलच्या ठिकाणी जागा उपलब्ध झालेली आहे. दिवसाला ज्योतिषांनी १००० ते २००० हजार रुपये कमावले आहेत. लोकांचे नशीब कोठे दडले आहे. याचा दाखला या व्यक्तीनी दिलेला आहे. रोज एक गाव फि रणारी ही ज्योतिष मंडळी त्यांना रोज पोटापाण्यासाठी रोज एका गावात जायचे व जिथे चांगला व्यवसाय होईल अशा ठिकाणी दप्तर मांडायचे. पवनाथडीत महिला बचत गटांच्या ठिकाणी ज्योतिषांना जागा कशी काय मिळाली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

४जत्रेत एखादा व्यक्ती जाता येता नजरेत भरला की, लगेच हात करायचा व लांबूनच त्या व्यक्तीच्या पेहरावावरून व हावभावावरुन पटेल असे एखादे वाक्य सांगायचे. यामुळे समोरच्या व्यक्तीला भविष्य ऐकण्याची उत्सुक्ता लागते. भविष्य पाहणारा माणूस समोर बसला की, हळूच पिशवीतून एखाद्या देवाचा फ ोटो काढायचा आणि या देवावर तुम्ही श्रद्धा ठेवा तुमचे भले होईल. कर नाही त्याला डर कशाला असे बोलायचे आणि..‘जीवाला जीव देणारी माणसे आहेत. तुम्ही देवाला मानत नसला तरी देव तुमचं भले करेल. भविष्य सांगण्याची किंमत मोजावी लागते. मग भविष्यवाणी खरी की खोटी याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मोठ्यामोठ्या लोकांची भविष्य आम्ही वर्तवली आहेत. रोज एका गावाला असतो आम्ही. बसा काय आहे ते खरं आणि नीट सांगतो.’ मग एकदा गाव समजलं की त्या गावातील राजकारणी मंडळीची माहिती सांगायला सुरूवात करणे आणि ओळखीच्या माणसाचा दाखला देणे.

Web Title: Astrologers embarked on the Pyannadi jatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.