सहायक विक्रीकर आयुक्ताकडे मिळाले घबाड

By Admin | Updated: October 28, 2015 23:44 IST2015-10-28T23:44:21+5:302015-10-28T23:44:21+5:30

व्यावसायिकाच्या थकीत व्यवसाय करात तडजोड करण्यासाठी १३ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलेल्या सहायक विक्रीकर आयुक्त सोमनाथ मधुकर नलावडे

Assistant Sales Tax Commissioner got a scam | सहायक विक्रीकर आयुक्ताकडे मिळाले घबाड

सहायक विक्रीकर आयुक्ताकडे मिळाले घबाड

पुणे : व्यावसायिकाच्या थकीत व्यवसाय करात तडजोड करण्यासाठी १३ लाखांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलेल्या सहायक विक्रीकर आयुक्त सोमनाथ मधुकर नलावडे याच्या राहत्या घराची किंमत दोन कोटी रुपये असून, त्याचे खाते असलेल्या अभ्युदय बँकेच्या डेक्कन जिमखाना येथील लॉकरमध्ये तब्बल १ किलो ५६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ३ किलो २१० ग्रॅम चांदी मिळून आल्याची माहिती अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिली.
सोमनाथ मधुकर नलावडे (वय ४0, रा. भोसलेनगर, गणेशखिंड रस्ता) याच्यासह त्याचा खासगी नोकर शिवाजी कृष्णा गुजर (वय ४२) याला एसीबीने मंगळवारी संध्याकाळी त्याच्या राहत्या घरातून अटक केली होती. पुण्यातील एका व्यावसायिकाचा सुमारे १ कोटी ६0 लाख रुपयांचा कर थकला होता. या करात तडजोड करून २३ लाख रुपये द्यावेत, अशी मागणी त्याने केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Assistant Sales Tax Commissioner got a scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.