सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून करणाऱ्याला १५ मेपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:10 IST2021-05-10T04:10:15+5:302021-05-10T04:10:15+5:30
पुणे : सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा डोक्यात राॅड मारून खून करणाऱ्या उत्तर प्रदेश येथील तरुणाला १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ...

सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा खून करणाऱ्याला १५ मेपर्यंत पोलीस कोठडी
पुणे : सहायक पोलीस निरीक्षकाच्या आईचा डोक्यात राॅड मारून खून करणाऱ्या उत्तर प्रदेश येथील तरुणाला १५ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
अफसर अस्लम अली (वय १९, रा. वारजे माळवाडी, मूळ उत्तर प्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. शहाबाई अरुण शेलार (वय ६५, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना वारजे माळवाडी परिसरातील रामनगर भाजीमंडई जवळ असलेल्या मैदानाशेजारी ७ ते ८ मेच्या दरम्यान घडली. सातारा पोलीस दलातील त्यांचा मुलगा विठ्ठल शेलार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भंगार विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीच्या हा प्रकार निदर्शनास आला. आरोपीने डोक्यात राॅड मारून त्यांचा खून करून ६५ हजार रुपये लांबविले. पोलिसांनी उत्तर प्रदेश येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना अली याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. त्यावेळी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यासाठी, तसेच गुन्हा करताना अंगावर असलेले कपडे जप्त करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील किरण बेंडभर यांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.