विकास सोसायटीच्या दिवंगत सचिवास मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:09 IST2021-05-28T04:09:34+5:302021-05-28T04:09:34+5:30

टिळेकरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव लालासाहेब जगताप यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी गेले पंधरा वर्षांपासून टिळेकरवाडी वि. ...

Assistance to the late Secretary of the Development Society | विकास सोसायटीच्या दिवंगत सचिवास मदत

विकास सोसायटीच्या दिवंगत सचिवास मदत

टिळेकरवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव लालासाहेब जगताप यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले. त्यांनी गेले पंधरा वर्षांपासून टिळेकरवाडी वि. का सेवा सोसायटीचे सचिव म्हणून उत्कृष्ट काम करत सभासद शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी मदत करीत त्यांच्या प्रगतीस हातभार लावला होता, त्यांच्या कार्यकाळामध्ये संस्थेला जिल्हा बँकेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी व उदरनिर्वाहासाठी टिळेकरवाडी सोसायटीचे संस्थापक राजेंद्र तुळशीराम टिळेकर यांनी व संस्थेच्या संचालक मंडळाने सर्वांच्या सहकार्याने त्या कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला. ही मदत त्यांच्या घरी जावून त्यांची पत्नी, दोन मुली व मुलगा यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यावेळी उरुळी कांचन विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण (आबा) टिळेकर, संस्थेचे संचालक अक्षय टिळेकर, सामाजिक कार्यकर्ते किसन टिळेकर उपस्थित होते.

--

फोटो क्रमांक : २७ उरुळी कांचन सोसायटी मदत

फोटो ओळ :- संस्थेचे सचिव कै. लालासाहेब जगताप यांच्या कुटुंबियांना रोख ७५ हजार रुपये व १०० किलो धान्य देताना संस्था चालक.

--

Web Title: Assistance to the late Secretary of the Development Society