शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

गोठविली तब्बल दोन हजार कोटींची मालमत्ता; डीएसके समूहाची सर्वाधिक मोठी मालमत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 05:16 IST

गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एकूण ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात दोन हजार १६५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आली आहे. त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या सर्वाधिक १ हजार ८०० रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.

पुणे : गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एकूण ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात दोन हजार १६५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आली आहे़ त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या सर्वाधिक १ हजार ८०० रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे़ पोलिसांकडून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेल्या आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया न्यायालयाच्या माध्यमातून सुरु केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिली़वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झालेल्या गुन्ह्यांचा आढावा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी घेतला़ त्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली़ या वेळी सहआयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अतिरक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, रवींद्र सेनगावकर, साहेबराव पाटील, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते़शुक्ला यांनी सांगितले की, ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात १०६ आरोपींना अटक केली आहे़ फसवणूक करणाºया आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरु करण्यात आली आहे़ त्यात डी़ एस़ कुलकर्णी, टेम्पल रोझ कंपनी, धनदा कॉर्पोरेशन यांचा प्रामुख्याने समावेश आहे़ टेम्पल रोझ कंपनीची ३०० कोटी रुपयांची मालमत्ता, फडणीस प्रॉपर्टी ३० कोटी रुपये, धनदा कॉर्पोरेशनची १० कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्याची प्रक्रिया पार पडली आहे़सायबर गुन्ह्यांमध्ये वाढशहरात सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून २०१६ मध्ये १६३ गुन्हे दाखल झाले होते़ त्यात दुप्पटीने वाढ होऊन २०१७ मध्ये ३२५ गुन्हे दाखल असून त्यात ९७ जणांना अटक करण्यात आली़ त्यात नऊ परदेशी नागरिकांचा समावेश आहे़ सायबर क्राईम सेलकडे २०१७ मध्ये ५ हजार ७४१ तक्रार अर्ज मिळाले होते़ त्यातील ५२८ अर्ज गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले़ सायबर सेलकडून ५२ गुन्हे उघडकीस आले असून त्यात ६ कोटी ७९ लाख १६ हजार ४७६ रुपये हस्तगत करण्यात आले़सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असून, तांत्रिक अडचणीबाबत पोलीस महासंचालकांना प्रस्ताव पाठविला आहे. त्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती करू शकत नाही़ त्यामुळे पोलिसांनी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली असून, ‘वुई फाइट सायबर क्राइम’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा प्रस्ताव सरकारकडेपिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे़ स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा निर्णय सरकारवर अवलंबून आहे़ शहरातील लोकसंख्या वाढते आहे़ त्यासाठी जास्त पोलिसांची आवश्यकता आहे़ पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यास पोलिसांची संख्या वाढेल, असे रश्मी शुक्ला यांनी सांगितले़

टॅग्स :Puneपुणे