मुल्यमापन प्रमुखाने पैसे घेऊन वाढवले विद्यार्थ्यांचे गुण; सिंबॉयसिसमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 08:54 PM2020-09-13T20:54:21+5:302020-09-14T20:16:56+5:30

१७८ मुलांबाबत घडला प्रकार

assessment head increased marks by taking money from the students in symbiosis | मुल्यमापन प्रमुखाने पैसे घेऊन वाढवले विद्यार्थ्यांचे गुण; सिंबॉयसिसमधील घटना

मुल्यमापन प्रमुखाने पैसे घेऊन वाढवले विद्यार्थ्यांचे गुण; सिंबॉयसिसमधील घटना

Next

पुणे : बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन विद्यार्थ्यांच्या गुणांचे पुनर्मुल्यमापन करताना १८७ विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचा प्रकार सिंबॉयसिसच्या दुरस्थ शिक्षण विभागात घडला आहे. याबाबत सिंबॉयसिस संस्थेच्या डिस्टन्स लर्निंगचे रजिस्टार नामदेव आनंदा कुंभार (वय ५८) यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़ त्यावरुन पोलिसांनी संदीप हेंगळे (रा. गुलमोहर अपार्टमेंट, सिंहगड रोड) आणि सुमित कुमार (रा. हैद्राबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, हा प्रकार मॉडेल कॉलनीतील सिंबॉयसिसमध्ये सप्टेंबर २०१८ ते डिसेंबर २०१९ दरम्यान घडला आहे़ संदीप हेंगळे हे
सिंबॉयसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचे मुल्यमापन विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्या करीता बनावट केस हिस्ट्रीज तयार करुन सुमित अग्रवाल या विद्यार्थ्याकडून पैसे घेतले व त्याचे पेपरचे गुण वाढविले़ दरम्यान, ही माहिती संस्थेला कळाल्यानंतर त्यांनी चौकशी केली.
त्यात संदीप हेंगळे आणि सुमित कुमार यांनी विद्यापीठाचे ग्रेस मार्क पॉलिसीचे उल्लंघन करुन एकूण १७८ विद्यार्थ्यांचे गुण अनधिकृतरित्या वाढल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर कुंभार यांनी संस्थेच्या वतीने सायबर पोलिसांकडे फिर्याद दिली असून सायबर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: assessment head increased marks by taking money from the students in symbiosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.