मेसाआई मंदिराच्या सभामंडपाने वडापुरी गावच्या वैभवात भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:11 IST2021-03-18T04:11:30+5:302021-03-18T04:11:30+5:30

इंदापूर तालुक्यातील वडापुरीमधील अण्णा भाऊ साठेनगर येथील मेसाआई देवीच्या सभामंडपाचे भूमिपूजन श्री भैरवनाथ ट्रस्ट वडापुरीचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्या ...

The assembly hall of the Mesai temple adds to the splendor of Vadapuri village | मेसाआई मंदिराच्या सभामंडपाने वडापुरी गावच्या वैभवात भर

मेसाआई मंदिराच्या सभामंडपाने वडापुरी गावच्या वैभवात भर

इंदापूर तालुक्यातील वडापुरीमधील अण्णा भाऊ साठेनगर येथील मेसाआई देवीच्या सभामंडपाचे भूमिपूजन श्री भैरवनाथ ट्रस्ट वडापुरीचे अध्यक्ष हनुमंत जगताप यांच्या हस्ते नारळ फोडून संपन्न झाला. या वेळी वडापुरीचे तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी तरंगे, ग्रामपंचायत सदस्या संगीता मारुती पासगे, सामाजिक कार्यकर्ते दयानंद चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य गणेश चंदनशिवे, विठ्ठल कदम तसेच बाबूराव पासगे, बी. आर. चंदनशिवे, संतोष पासगे, अमोल पासगे, आप्पासाहेब धोत्रे ,चांगदेव पासगे, सूरज पासगे, आप्पाजी पासगे, दीपक पासगे, सुनील पासगे, रणजित चंदनशिवे उपस्थित होते.

शिवाजी तरंगे म्हणाले की, वडापुरीतील अण्णा भाऊ साठेनगर येथील मेसाआई देवीच्या ठिकाणी सभामंडप महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आमदार फंडातून मंजूर झाला असून, वडापुरी गावचे सरपंच संगीता तरंगे यांच्या प्रयत्नातून यश आले असून, ५ लक्ष रुपयांचा हा सभामंडप आहे.

१७ इंदापूर सभामंडप

वडापुरी येथील मेसाआई मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रामस्थ.

Web Title: The assembly hall of the Mesai temple adds to the splendor of Vadapuri village