Assault on wife on her way home from work | कामावरून घरी निघालेल्या पत्नीवर हल्ला

कामावरून घरी निघालेल्या पत्नीवर हल्ला

सुनिता कृष्णा दांडेल ( वय २७ वर्षे, रा. ज्योतिबा नगर, आंबेठाण तालुका खेड , मुळ राहणार परभणी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा राम दांडेल (वय ३४ वर्षे ) काळू काशीराम माळसे (वय ३५ वर्षे ) अमलेश्वर गुलचंद मस्के (वय ३५ वर्षे, रा. तिघे राहणार शेलपिंपळगाव तालुका खेड ) यांना अटक केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सुनिता दांडेल या चाकण एमआयडीसी मधील इंडोरन्स कंपनीत काम करतात. मंगळवारी रात्री कामावरून सुट्टी झाल्यानंतर घरी जात असताना त्या महाळुंगे गावाच्या कमानीजवळ रिक्षात उतरून द्वारका सिटीकडे रस्त्याने पायी जात होत्या. रात्री साडे सातच्या सुमारास त्यांचा पती कृष्णा आणि त्याच्या दोन साथीदारांनी म्हणून सुनिता यांचा रस्ता अडवला आणि त्यांचे तोंड दाबून खाली पडले. तर दोन्ही आरोपींनी त्यांच्या हात पकडले. त्यानंतर कृष्णा याने सुनीता यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये सुनिता यांच्या खांद्यावर मानेवर डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी संबंधित तिघांना अटक केली असून अधिक तपास महाळुंगे पोलिस करीत आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Assault on wife on her way home from work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.