समजावून सांगणाऱ्याने पोलिसाला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:13 IST2021-09-21T04:13:43+5:302021-09-21T04:13:43+5:30

पुणेः तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आल्यानंतर समजावून सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर ...

The assailant beat the police | समजावून सांगणाऱ्याने पोलिसाला केली मारहाण

समजावून सांगणाऱ्याने पोलिसाला केली मारहाण

पुणेः तक्रार देण्यासाठी पोलीस चौकीत आल्यानंतर समजावून सांगणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दोघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सचिन उद्धव सूर्यवंशी (वय २६, रा. बी. टी. कवडे रोड) व एक २५ वर्षांची महिला अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही पती-पत्नी असल्याची माहिती आहे. याबाबत पोलीस कर्मचारी सोमनाथ बनसोडे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना हडपसर पोलीस चौकीसमोरील रोडवर रविवारी रात्री दहाच्या सुमारास घडली आहे.

आरोपी व महिला दोघांची भांडणे झाल्याची तक्रार देण्यासाठी हडपसर पोलीस चौकीत आले होते. दोघांकडे चौकशी केली असता, त्यांनी पती-पत्नी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांच्या समोरच आरोपी व्यक्ती पत्नीला मारहाण करत होता. त्यावेळी कर्मचारी बनसोडे यांनी दोघांना काय असेल ती तक्रार देऊन भांडणे न करण्यास सांगितले होते. त्यावेळी दोघांनी बनसोडे यांनाच धक्काबुक्की करत अपशब्द वापरून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

Web Title: The assailant beat the police