शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रश्न विचारून शासन व्यवस्थेला हादरवून सोडा, अमोल पालेकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 13:20 IST

सध्या आजूबाजूला सुरु असलेली असुरक्षितता, मुस्कटदाबी पाहिली असता मन उद्विग्न होत आहे. मात्र या उद्विग्नतेने निराश न होता शासन आणि व्यवस्थेला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून सोडावे

पुणे, दि. 20 : सध्या आजूबाजूला सुरु असलेली असुरक्षितता, मुस्कटदाबी पाहिली असता मन उद्विग्न होत आहे. मात्र या उद्विग्नतेने निराश न होता शासन आणि व्यवस्थेला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून सोडावे असे आवाहन ज्येष्ठ दिगदर्शक व अभिनेते अमोल पालेकर यांनी केले.सकाळी मुसळधार पावसात महर्षी शिंदे पुलावरून सुरु झालेली अंनिसची "जबाब दो" निषेध रॅली साने गुरुजी स्मारक येथे पोहचली. त्यावेळी तिथे झालेल्या निर्धार सभेत अमोल पालेकर बोलत होते. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, मुक्ता दाभोलकर, मुक्ता मनोहर, श्रीपाल ललवाणी उपस्थित होते.  बोगद्यातून जाताना सर्वत्र अंधकार असताना टोकाला उजेडाचा कवडसा दिसत असतो. तसा सगळीकडे अंधकार असतानाही निराश न होता व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची मोहीम हाती घेऊन हादरवून टाकावे असे अमोल पालेकर यांनी सांगितले.

स्वातंत्रा नंतर ७० वर्षांनी सुराज्याची अवस्था पाहिली असता आज समाज सुधारणेचा आग्रह धरणाऱ्या गोपाळ गणेश आगरकर यांची आठवण येत आहे. त्यामुळे नव्या स्वातंत्र लढ्याची सुरुवात केली पाहिजे असे विद्या बाळ यांनी सांगितले. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात शासनाकडून फसवणूक आल्याचे मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले.

डॉ. दाभोलकर यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त सकाळी रॅली काढण्यात आली. डॉ. दाभोलकर, गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी यांच्या मारेकऱयांना कधी पकडणार याचा शासनाला जाब विचारण्यासाठी ही रॅली निघाली आहे. रॅलीची सुरुवात करताना बाबा आढाव म्हणाले, "एकीकडे गोरक्षकांनी चालवलेला हिंसाचार आणि दुसरीकडे नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या हत्या, हे चित्र पाहता सरकारला दहशतवाद पोसायचा असल्याचे दिसून येते." रॅलीमध्ये मुकता मनोहर, हमीद दाभोलकर, प्रधान सचिव मिलिंद देशमुख, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारAmol Palekarअमोल पालेकर