शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो, सर्व्हेच्या नावाखाली घरी येणाऱ्यांचे ओळखपत्र विचारा : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 20:48 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत.

ठळक मुद्देसर्व्हेच्या नावाखाली अथवा शासकीय कर्मचारी असल्याचे सांगून घरात घुसल्याच्या तक्रारी शहरात गंभीर गुन्हे व गुन्हेगारांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात येणार

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली घरात शिरल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्यांकडे ओळखपत्र विचारा आणि काही संशयास्पद वाटल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. नागरिकांना तत्काळ मदत केली जाईल, असे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले. अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पोलीस ठाण्यांना भेटण्यास सुरुवात केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत असून शहरातील गुन्हेगारी व इतर गोष्टींचा आढावा घेत आहेत. कोरोना बाधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहेत. गुप्ता यांनी सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व्हेच्या नावाखाली अथवा शासकीय कर्मचारी असल्याचे सांगून घरात घुसत असल्याच्या काही तक्रारी कानावर आल्या आहेत. जर कोणी आपल्याकडे आले तर त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये़ अशा कोणी व्यक्ती घरात येण्याचा प्रयत्न करु लागल्या तर त्यांना त्यांचे ओळखपत्र विचारा़ संशयास्पद वाटल्यास तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा.  नागरिकांना पोलीस लगेच मदत करतील.  ...................

सुरक्षित वातावरण तयार करण्यावर भरशहरात गंभीर गुन्हे व गुन्हेगारांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिक व महिलांना रात्रीच्या वेळी सुरक्षित वाटले, असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मुंबईतील रस्त्यांवर जसे रात्री उशिरापर्यंत महिला सुरक्षितपणे वावरत असतात. तशाच प्रकारे पुण्यातील महिलाही सुरक्षितपणे वावरतील असा कायदा व सुव्यवस्थेचा धाक ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी बेसिक पोलिसिंगवर भर राहणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcommissionerआयुक्तPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या