नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे
By Admin | Updated: August 6, 2014 23:25 IST2014-08-06T23:25:57+5:302014-08-06T23:25:57+5:30
इंदापूरच्या नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे यांची, तर उपनगराध्यक्षपदी भरत शहा यांची निवड झाली आहे.

नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे
>इंदापूर : इंदापूरच्या नगराध्यक्षपदी अशोक इजगुडे यांची, तर उपनगराध्यक्षपदी भरत शहा यांची निवड झाली आहे. यासाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येकी तीन मतांच्या फरकाने इंदापूरच्या नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता अबाधित राखली.
या मतदानात कॉँग्रेसची सर्व नऊ मते त्यांना मिळाली, तर राष्ट्रवादीला मात्र सहा मतांवर समाधान मानावे लागले. मतदानास राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक अनुपस्थित होते. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अशोक इजगुडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गजानन गवळी यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपनगराध्यक्षपदासाठी विद्यमान उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी काँग्रेसकडून, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिता ढावरे यांनी उमेदवारी दाखल केली होती.
दुपारी साडेबारा वाजता पिठासिन अधिकारी तहसीलदार संजय पवार यांनी विशेष सभा बोलाविली. या सभेस एकूण 17 पैकी 15 नगरसेवक उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय वाशिंबेकर, विरोधी पक्षनेते पांडुरंग शिंदे हे देाघे अनुपस्थित होते. काँग्रेसच्या नऊ नगरसेवकांनी अशोक इजगुडे व भरत शहा यांच्या बाजूने कौल दिला. राष्ट्रवादी काँग्रेसची सहा मते ढावरे व गवळी यांना मिळाली. (वार्ताहर)
4नगराध्यक्षपदावर अशोक इजगुडे ,उपनगराध्यक्षपदावर भरत शहा यांची निवड झाल्याचे पिठासिन अधिकारी पवार यांनी जाहीर केले. सहायक अधिकारी म्हणून मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी काम पाहिले. निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी व त्यांच्या सहका:यांनी बंदोबस्त ठेवला होता.