राख ग्रामस्थांचा गुंजवणी पाईपलाईनला 'विरोधाचा सूर मावळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:39+5:302021-09-02T04:24:39+5:30
गुंजवणी धरणाचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे राख गावातील तळ्याशेजारीच येणार आहे. त्याचे सर्वेक्षणाचे काम मागील महिण्यात सुरू होणार होते. राख ...

राख ग्रामस्थांचा गुंजवणी पाईपलाईनला 'विरोधाचा सूर मावळला
गुंजवणी धरणाचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे राख गावातील तळ्याशेजारीच येणार आहे. त्याचे सर्वेक्षणाचे काम मागील महिण्यात सुरू होणार होते. राख ग्रामस्थांना व ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांना या प्रकल्पा बाबत काहीच नव्हते. त्यामुळे या प्रकल्पाविषयी शंका-कुशंकाचे निरसन लोकांसमोर करा अशी विनंती केली होती. मात्र, याचा वेगळा अर्थ काढत स्थानिक गाव पुढाऱ्यांची नाहक बदनामी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला. त्यामुळे गावकऱ्यांनी गुंजवणी प्रकल्पाचे अधिकारी व एल अँड टीच्या अधिकाऱ्यांची राख गावच्या ग्रामदैवताच्या सभामंडपात बैठक लावली. सोमवारी अधिकाऱ्यांनी प्रोजेक्टर व कागदपत्र दाखवत लोकांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
या वेळी राखच्या सरपंच उज्ज्वला खंडाळे, उपसरपंच दत्तात्रय रणनवरे, महेंद्र माने, विलास रणनवरे, प्रकाश ताटे, वसंतराव रणनवरे, गजानन रणनवरे, मुगुटराव रणनवरे, विजय पवार, यशवंत रणनवरे, गोरख रणनवरे यांसह ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राख, कर्नलवाडी व गुळुंचे ग्रामस्थांच्या शेतीवर गुंजवणी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचे शिक्के आहेत. वेल्हा तालुक्यातील प्रकल्पबाधित पुरंदरच्या या दुष्काळी भागात येण्यास निरुत्साही आहेत. जर प्रकल्पग्रस्तांना याभागतील जमिनी नको असतील व या भागातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळणार नसेल तर पुनर्वसनाचे शिक्के कधी काढणार, तसेच यापूर्वीच्या नियोजनानुसार भूपाटाने पाणी राख तळ्यात येणार होते. यामुळे सिंचनक्षेत्र जरी कमी असले तरी पाटाच्या पाणी शेजारच्या विहिरीत पाझरणार नाही. विहिरींच्या पाणीपातळीत कोणतीही वाढ होणार नाही. आता ते न होता ठिबक पद्धतीने थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे. हक्काच्या पाझर पाण्याला शेतकऱ्यांना मुकावे लागणार आहे. तसेच बंद पाईपलाईनमधून पाणी राख, कर्नलवाडी व गुळुंचेच्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळणार याची शंका शेतकऱ्यांमध्ये होती.
सोमवारी राख (ता. पुरंदर) येथील राखमलस्वामी मंदिरात गुंजवणी प्रकल्पाचे अधिकारी, एल अँड टी कंपनीचे अधिकाऱ्यांनी राख, रणवरेवाडी, कापडदरा, पवारगोठा येथील शेतकऱ्यांची बैठकीत लोकांच्या प्रश्नांना प्रतिसाद देत अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरे दिली. पुनर्वसन शिक्के काढण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करून वेळ पडली तर पुनर्वसन मंत्री, स्थानिक खा. सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांची भेठ घेऊन लवकरात लवकर मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी केला.
या योजनेची जमेची बाजू म्हणजे ही योजना विनामोटर विनावीज चालणार असल्याचा दावा अधिकारी करत आहेत. दीड फुटी पाईपलाईनमधून शेतकऱ्यांना बांधावर जोड दिले जाणार आहे. त्याच ठिकाणी पाणी मोजण्याचे मीटर लावले जाणार असून ते शेतकऱ्यांना १ हजार लिटरला प्रति रुपयांप्रमाणे मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना शेतात ठिबक सिंचन पद्धतीने शेती करावी लागेल.
. आम्ही पाण्यासाठी पोळलेले लोक आहोत. शेतीला पाणी ही आमची मूलभूत गरज आहे. पण श्रेय घेण्याच्या नादात राजकीय लोक नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत हे गैर आहे. आता आम्हाला योजना समजली असून आमचा तूर्त तरी कोणताही विरोध नाही."
महेंद्र माने (शेतकरी)
राख येथील ग्रामदैवताच्या मंडपात शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करताना प्रकल्पाचे अधिकारी.