शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

आषाढी वारी: ज्ञानोबा माऊली- तुकाराम नामघोष; टाळ - मृदंगाच्या गजरात अलंकापुरी भारावली; माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 20:18 IST

आषाढी वारी : सलग दुसऱ्या वर्षी शासकीय नियमावलीत सोहळा संपन्न;अलंकापुरीतून माऊलींच्या चल पादुकांचे प्रस्थान

भानुदास पऱ्हाड- 

आळंदी :              अवघाचा संसार सुखाचा करीन !                         आनंदे भरीन तिन्ही लोक !!                        जाईन गे माये तया पंढरपुरा !                          भेटेन माहेर आपुलिया !!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोट्याखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला... ना पखवादाची थाप घुमघुमली... ना फेर - फुगड्या... ना देहभान विसरून नाचणारे वारकरी... ना मोठा हरिनामाचा गजर... ना भव्य - दिव्य स्वरूप. शासनाच्या नियमांचे पालन करत अगदी साध्या पद्धतीने संबंधित निमंत्रित वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास माउलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.

प्रस्थान सोहळ्यास शुक्रवारी (दि.०२) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. विणामंडपात सकाळी दहानंतर ह.भ.प. भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. बाराच्या दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविण्यात आला. त्यानंतर चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली. 

ब्रम्हवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना महाद्वारातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर माऊलींचे दोन्ही अश्व सन्मानपूर्वक महाद्वारातून मंदिरात आणण्यात आले. माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार - आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.

वीणा मंडपातून चलपादूका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारात उपस्थित वारकऱ्यांच्या "ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या" जयघोषात मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.             माऊलींच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान प्रसंगी पवमान अभिषेक, ब्रम्हवृन्दांचा वेदघोष, समाधीवर माऊलींच्या मुखवट्याला दुध, मध व दह्याचा अभिषेक करण्यात आला. नंतर गरम पाण्याने ‘श्रीं’ना स्नान घालण्यात आले. सुवासिक चंदन, अत्तर लावून माऊलींची सर्वांगसुंदर पूजा बांधून मुखवट्यावर पोशाख परिधान करण्यात आला. या विधिवत पूजासमयी माऊलींचे ‘साजिरे’ रूप आकर्षक दिसून येत होते.

 

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीcorona virusकोरोना वायरस बातम्याPandharpur Wariपंढरपूर वारी