शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

‘वारी'च्या सोहळ्याला 'योग'दिनाची पहाट;फलकांनी सजले शहर

By राजू इनामदार | Updated: June 21, 2025 18:07 IST

हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे.

पुणे : ‘योगियांचे गुरू’ अशी ओळख असलेले संतश्रेष्ठ ज्ञानदेव महाराज आणि आपल्या रोकड्या अभंगांमधून थेट विठ्ठलाला जाब विचारणारे जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पुण्यात आगमन, शनिवारी मुक्काम अन् त्याचदिवशी जागतिक योग दिन. हा योगायोग साधला गेला नसता तरच नवल! त्यामुळेच ‘पाऊले चालती पंढरीची वाट, योगदिवसाची पुण्याई पहाट’ असे काव्य लिहिलेल्या रंगीत फलकांनी सारे शहर सजले आहे. गल्लीबोळातील सार्वजनिक मंडळांचे वारकरी भोजन शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर आहे, पण शनिवारी पहाटेचा योगदिनच त्याचा कळस होईल याची काळजी घेतली जात आहे.

प्रत्यक्ष पालख्यांचे आगमन शहरात शुक्रवारी संध्याकाळी उशीरा झाले तरी दुपारपासूनच लहानमोठ्या दिंड्यांचा प्रवेश होण्यास सुरूवात झाली. नेहमीच्या ठरलेल्या मुक्कामी या दिंड्यांमधील वारकरी वेगवेगळ्या रस्त्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत निघाले आहेत. पुढच्या २२ दिवसांचे साहित्य घेतलेली त्यांची वाहने रस्त्यांच्या कडेला उभी आहेत. डोईवर तुळस, हातात विणा घेतलेल्या वारकऱ्यांचे अनेक संस्था, संघटना, काही सार्वजनिक मंडळांनी पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांचे पुडे, केळी देऊन स्वागत केले. वारकरीही मोठ्या उत्साहाने या स्वागताचा स्विकार करत विसाव्याच्या ठिकाणाकडे निघाले होते.

शनिवारी (२१जून) जागतिक योगदिन आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारचे त्याला पाठबळ तो खासगी संस्था, संघटना यांनाही तो साजरा करण्याचे सरकारचे आवाहन आहे. पुण्यात स. प. महाविद्यालयाच्या यातील मुख्य कार्यक्रम होत आहे. त्याचे फलक लावताना संयोजकांनी शहरात पालख्यांचा मुक्काम आहे हे लक्षात घेऊन तसेच फलक शहरात सर्वत्र लावले आहेत. श्री विठ्ठलाच्या छायाचित्राबरोबरच या फलकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आहेच शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री याशिवाय मंत्री-स्थानिक नेत्यांचीही छायाचित्र आहेत. लाखो वारकरी, भजन, प्रवचन किर्तन आणि आता योगासन ही अशी जाहिरात आहे.

शहराचे अनेक चौक अशा फलकांनी सजले आहेत. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही असेच फलक अनेक ठिकाणी झळकावले आहेत. त्यावर अर्थातच सेनेच्या नेत्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मोठी रंगीत छायाचित्र आहेत. भक्तीयोग असे नामकरण त्यांनीही फलकांवर केले आहे. वारकऱ्यांचा सहभाग घेण्याचा हा प्रयत्न पक्षीय किंवा राजकीय होणार नाही याचीही काळजी थेट पक्षाचे नाव किंवा चिन्ह न वापरल्यामुळे घेण्यात आल्याचे दिसते.

पालख्यांचा शुक्रवारी व शनिवारीही पुण्यात मुक्काम आहे. शुक्रवारी सायंकाळी नेहमीचे भोजन वाटप मुक्कामाच्या ठिकाणी झाले. आता शनिवारी दिवसभर वारकऱ्यांना ठिकठिकाणची निमंत्रणे असतात. वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक असे कार्यक्रम आयोजित करून वारकऱ्यांना निमंत्रीत करतात. महापालिकेची मागील ३ वर्षे रखडलेली निवडणूक लवकरच होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी वारकऱ्यांची सेवा करून प्रभागातीत मतदारांचे मतांचे पुण्य मिळावे यासाठी कंबर कसली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAshadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025PandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी