शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Ashadhi Wari: "ऐक एक सखये बाई..." कृष्णाच्या गवळणींना दिवे घाटात धरला फेर

By नितीन चौधरी | Published: June 14, 2023 8:55 PM

वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघांनीही कृपा करत वाऱ्याच्या थंडगार लहरींसोबत वातावरण आणखीनच आल्हाददायक केले...

पुणे : असा कसा देवाचा देव बाई लंगडा, श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा, ऐक एक सखये बाई, नवल मी सांगू काई त्रेलोक्याचा धनी तो हा यशोदेसी म्हणतो आई, अशा गवळणींमधून कृष्णाला आर्जव करत माऊलींच्या दिंड्यांनी चढणीला अवघड असा दिवे घाट लीलया सर केला. वारकऱ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मेघांनीही कृपा करत वाऱ्याच्या थंडगार लहरींसोबत वातावरण आणखीनच आल्हाददायक केले. 

पुण्यातून सहा वाजता सोहळा हडपसर कडे मार्गस्थ झाल्यानंतर सुमारे ९ च्या सुमारास पहिला विसावा हडपसरमध्ये झाला. तासाभराच्या विश्रांतीनंतर सोहळा सासवड रस्त्याने निघाला. ऊन वाढलेले असल्याने पालखी सोहळ्यात नेहमी सहभागी होणारे पुणेकर यंदा तुलनेने खूपच कमी होते. काही काळ ऊन आणि थोडा वेळ ढगाळ वातावरण असा ऊन सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे वारकऱ्यांना उन्हाचा फारसा त्रास जाणवला नाही. फुरसुंगी पर केल्यानंतर पावसाची एक सर सुखद गारवा देऊन गेली. दिवे घाटाच्या पायथ्यापूर्वी उरुळी देवाची येथे सोहळा काही काळ विसावला. त्यांनतर ऊन पुन्हा वाढू लागले. घाटाला सुरूवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा विसावा घेत वारकऱ्यांनी घाट सर करण्यासाठी अंगात ऊर्जा भरून घेतली.

घाट चढण सुरु करण्यापूर्वी माऊलींच्या पालखी ला आणखी एक बैलजोडी जुमण्यात आली. रथा पुढील दिंड्या सोहळ्याचा वेग ठरवत असतात. घाटाची चढण अवघड असल्याने याच दींड्या वारकऱ्यांना कष्ट होऊ नयेत याची खबरदारी घेतात. त्यासाठीच या दींड्या कृष्णाच्या गवळीनिंचा आधार घेतात. त्यातून वारकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. वारकरी गवळणी गाताना फेर धरून नाचू लागले त्यामुळे ऊन चटके मारत होते तरी अधूनमधून येणाऱ्या वाऱ्याच्या थंडगार लहरिंनी वातावरणात एक आगळावेगळा उत्साह संचारला. माऊली माऊली असा नाद हजार करत सुमारे दोन तासांनी सोहळा दिवे घाट सहज पार केला. घाट चढण पार केल्यानंतर वारकऱ्यांनी पुन्हा हरिनामाचा गजर करत विसावा घेतला.

आळंदीहून पुण्यात येताना उशीर झाला असताना सासवडच्या वाटेवर माऊली काहीशी अर्थात तासभर लवकर पोचली होती. झेंडे वाडी येथील विसावा तासभर होता. त्यानंतर सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सासवड येथे सव्वा नऊला पोचली.

पालखीची अडवली वाटतुकाई दर्शन पासून फुरसुंगी परिसरातील नागरिकांनी पालखी निम्म्याहून अधिक वाट अडवली होती. हे नागरिक रस्त्यातच उभे राहिल्याने दिंद्यांना चालणे अवघड झाले होते. अनेक नागरिक दिंडी व्यवस्थापकांनी सांगूनही बाजूला होत नव्हते. याबाबत वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. हीच स्थिती थेट घाटाच्या पायथ्यापर्यंत होती.

टॅग्स :Puneपुणेsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखी