शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा परिषदेसमोर आशा सेविकांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 16:22 IST

कोरोना काळातील संपाचा मोबदला मागण्यांसाठी सुरू आहे संप शेकडो आशा सेविकांनी धरले धरणे

पुणे : पुण्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आशा सेविकांनी आंदोलन सुरू केलं आहे. आशा सेविकांनी १५ जूनपासून सुरू केलेल्या संपाचा भाग म्हणून हे आंदोलन होते आहे. जवळपास पाचशेहून अधिक आशा सेविका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यातील ६६ हजार आशा सेविका व ४ हजार गटप्रवर्तक यांनी १५ जूनपासून राज्यभरात संप सुरू केला आहे. आशा स्वयंसेवकांना कराव्या लागत असलेल्या माहितीचे संकलन, अहवाल सादरीकरण ,लसीकरण अशा सगळ्या कामाची दरमहा चार हजार रुपयांची रक्कम पूर्णपणे मिळत नाही. याच बरोबर आशा सेविकांना या कामा व्यतिरिक्त अन्य ७२ कामे करावी लागतात. आणि त्या कामाचा मोबदला त्यांना साधारणपणे २५०० रुपये मिळतो. पण कोरोना काळात त्यांना ८ तास काम करावे लागत असल्यामुळे ही रक्कम मिळणे बंद झाले.  सध्या त्यांना दररोज आठ तास काम करून सुद्धा ५ हजार रूपयांपेक्षा कमी मानधन मिळते आहे. कोरोना महामारी च्या काळात त्यांच्याकडून अधिक काम देखील करून घेतले गेले आहे. मात्र या कामाचा मोबदला म्हणून या आशा स्वयंसेविकांना काहीही पैसे देण्यात आले नाहीत.

याच पार्श्वभूमीवर कोरोना काळात केल्या गेलेल्या या कामासाठी एप्रिल पासून प्रतिदिन पाचशे रुपये मिळायला हवेत, तसेच त्यांना अँड्रॉइड मोबाईल दिले जावेत, कोरोनाबाधित होऊन मृत्यू पावलेल्या आशा सेविकांच्या वारसांना सरकारी नोकरी मिळावी तसेच त्यांची मासिक प्राप्ती किमान वेतन एवढी व्हावी या मागण्यांसाठी आशा सेविका न कडून आंदोलन केले जात आहे. आज सकाळपासूनच जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर आशा सेविकाकडून आंदोलन केले जाते आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस