शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पिंपलोळीतील जमीन हडप प्रकरणी आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर व आयआरबी कंपनीला खटल्यातून वगळले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 22:28 IST

जमीन हडप केल्याच्या खटल्यातून आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर, दत्तात्रय गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला वगळण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्दे दरम्यानच्या काळात १३ जानेवारी २०१० रोजी सतीश शेट्टी यांची निघृण हत्या शासकीय जमीन हडप करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे आरोपपत्रात नमूद

पुणे : जमीन हडप केल्याच्या खटल्यातून आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर, दत्तात्रय गाडगीळ, आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर आणि आयआरबी कंपनीला वगळण्याचा आदेश दिला आहे. विशेष न्यायाधीश ए. के. पाटील यांनी हा आदेश दिला आहे. खटल्यातील प्रमुख आरोपी व कंपनीलाच वगळणे हा सीबीआयसाठी मोठा धक्का आहे     आयआरबी कंपनीसह दत्तात्रय गाडगीळ ( वय ६२, रा. मैफल अपार्टमेंट, कर्वेनगर), आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चा संचालक विरेंद्र दत्तात्रय म्हैसकर ( वय ४६, रा. चांदवली फार्म रस्ता, अंधेरी पूर्व), आर्यन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, अ‍ॅड. अजित बळवंत कुलकर्णी ( वय ५८, रा. पौड रोड, कोथरूड), ज्यो डेव्हलपमेंट कापोर्रेशनची मालक ज्योती अजित कुलकर्णी ( वय ५६, रा. गणेशकृपा सोसायटी), लोणावळा येथील सब रजिस्टार अश्विनी क्षीरसागर ( वय ६०, कसबापेठ पुणे), मावळ येथील सब रजिस्टार अनंत पांडुरंग काळे ( वय ६१, काळेवाडी, चहोºली बुद्रुक), सखाराम संभाजी हराळे ( वय ४१, रा. बीड), संतोष शांतीलाल भोत्रा (रा. कोथरूड), नवीनकुमार राय (रा. कर्वेनगर), शांताराम कोंडीबा दहिभाते ( वय ६३, रा. बेडसे, पोस्ट कामशेत ता. मावळ), विष्णू मानकू बोंंबले ( वय ६२, रा. मावळ), अतुल गुलाबराव भेगडे (वय ४५, रा. तळेगाव दाभाडे), अशोक किसन कोंडे (वय ४४, रा. ताकवे बुद्रूक, मावळ), नरींदर हरनामसिंग खंडारी ( वय ७७, रा. लोणावळा), सिराज रज्जाक बागवान (वय ४९, प्राईड प्लॅटिनम सोसायटी, बानेर), पंकज पांडुरंग ढवळे (वय ३५, कामशेत, मावळ) यांच्यावर आरोपत्र दाखल करण्यात आले आहे.   या खटल्यातून वगळण्याबाबत म्हैसकर, गाडगीळ आणि दोन कंपन्यांच्या वतीने अ‍ॅड. श्रीकांत शिवदे यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये या गुन्ह्याशी चौघांचा कोणताही संबंध नसल्याचे नमूद करण्यात आले. तसेच त्यांच्याविरूध्द कोणताही पुरावा नसल्याचे बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौघांविरूध्द भक्कम पुरावा असल्याचे नमूद करताना चौघांनी खटल्यातून वगळण्यासंबंधी केलेला अर्ज फेटाळण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआय आणि बचाव पक्षाचा युक्तीवाद ऐकून बचाव पक्षाचा अर्ज मान्य केला. माहिती अधिकार कार्यकर्ता सतीश शेट्टी यांनी १५ आॅक्टोंबर २००९ रोजी विरेंद्र म्हैसकरांसह १५ जणाविरोधात लोणावळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पिंपलोळी आणि मावळ तालुक्यातील ओझारडे गावातील सरकारी जमीन फसवणूक करून विकत घेतल्याबाबत ही फिर्याद होती. त्यानुसार वडगाव मावळ येथील न्यायालयात क्लोजर रिर्पोर्ट सादर केला होता. दरम्यानच्या काळात १३ जानेवारी २०१० रोजी सतीश शेट्टी यांची निघृण हत्या झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने गुन्ह्याचा तपास सीबीआयकडे सोपविला. तसेच जमीन हडप केल्याप्रकरणात समांतर तपास करण्यासाठी सीबीआयने रिटपिटीशन दाखल केले. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा त्वरित तपास करण्याचा आदेश दिला होता.   

.........................................

शासनाची फसवणूक केल्याचे आरोपपत्रात नमूद    गाडगीळ, म्हैसकर, अ‍ॅड. कुलकर्णी, अजित कुलकर्णी, अश्विनी क्षीरसागर तसेच इतरांनी२००७ ते २००९ च्या कालावधीत पिंपलोळी येथील जमीन हडप करण्यासाठी कट रचला. शासनाची जमीन हडपण्यासाठी आयआरबीच्या समांतर दोन कंपन्या स्थापन केल्या. आर्यन इन्फ्रास्ट्रक्चरआणि ज्यो नावाने  ह्या दोन कंपन्यांनी शेतक-यांकडून ७३.८८ हेक्टर जमीन स्वत:कडे हस्तांतरित केली. त्यानंतर ही जमीन आयआरबी कंपनीच्या नावे करून शासकीय जमीन हडप करून महाराष्ट्र शासनाची फसवणूक केल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले होते.

टॅग्स :PuneपुणेCBIसीबीआय