अरिजितचे मराठीत ‘येस, आय कॅन’
By Admin | Updated: May 18, 2015 23:17 IST2015-05-18T23:17:20+5:302015-05-18T23:17:20+5:30
सुरेल गायकीने तरुणांना वेड लावणारा गायक अरिजित सिंग आता मराठीतही गाणी गाणार आहे. ‘येस, आय कॅन’ या सिनेमाद्वारे अरिजित मराठी सिनेमा गायनात पदार्पण करतो आहे.

अरिजितचे मराठीत ‘येस, आय कॅन’
सुरेल गायकीने तरुणांना वेड लावणारा गायक अरिजित सिंग आता मराठीतही गाणी गाणार आहे. ‘येस, आय कॅन’ या सिनेमाद्वारे अरिजित मराठी सिनेमा गायनात पदार्पण करतो आहे. या सिनेमातील ‘पावलांना मार्ग कळेना’ हे गाणं तो गाणार आहे. अक्षय खोत यांनी हे गाणं लिहिले असून संगीतही त्यांचेच आहे. वडील आणि मुलाचे नाते एका वेगळ्या पद्धतीने मांडणाऱ्या या सिनेमासाठी गाणे हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.