शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

कला साक्षरतेच्या समृद्धतेसाठी पुण्यातील कलाकार एकाच छताखाली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:36 IST

सिनेमा, क्रिकेट, संगीत, साहित्याप्रमाणे रंगाचे भावविश्व रसिकांना श्रीमंत करेल, या भावनेतूनच सुमारे सव्वाशे कलाकार एकत्र येऊन रंगबेरंगी कलाकृतींचा खजिना रसिकांसाठी घेऊन येत आहेत.

ठळक मुद्देपुणे आर्ट सोसायटीचा पुढाकार कलाकारांनी एकत्र येऊन ‘आर्ट @ मी’ व्हॉटसअ‍ॅप ग्रूपची निर्मिती, सुमारे ३०० कलाकार एकत्ररंगांचा पहिला उत्सव १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी

पुणे : आत्ममग्नता, स्वत:भोवती निर्माण झालेले वलय, सर्वसमावेशकतेचा अभाव, कलाक्षेत्राविषयी अनास्था यामुळे पुण्यातील चित्रकार, छायाचित्रकार, कलाकार मंडळी एकत्र येत नसल्याची चर्चा रंगत असते. वैयक्तिक प्रगती करताना, कलाक्षेत्राचा सर्वसामावेशक विचार करण्याच्या दृष्टीने पुण्यातील कलाकारांनी अनोखे अभियान साकारण्याचे ठरवले आहे. कलाकारांची अस्मिता जपणारी एकही संस्था पुण्यात मागील सत्तर वर्षात झालेली नव्हती. हेच लक्षात घेऊन बॉम्बे आर्ट सोसायटीच्या धर्तीवर पुणे आर्ट सोसायटीची स्थापना करण्यासाठी सर्वजण एकवटले आहेत. रसिकांमधील कलासाक्षरता वाढावी, यादृष्टीने कलाकारांच्या चमूतर्फे पहिला कला महोत्सवही आयोजित करण्यात आला आहे.वर्ष-दीड वर्षापूर्वी पुणे आर्ट सोसायटीची संकल्पना साकारण्यास सुरुवात झाली. काही कलाकारांनी एकत्र येऊन ‘आर्ट @ मी’ हा व्हॉटसअ‍ॅप ग्रूप तयार केला. दीड वर्षात महाराष्ट्रातील सुमारे ३०० कलाकार या ग्रूपच्या माध्यमातून एकत्र आले. फॉर्वर्डेड मेसेजवर बंदी घालत केवळ कला क्षेत्राशी संबंधित चर्चा, पोस्ट, आपले मत मांडण्याचे बंधन सर्वांनी घालून घेतले. कला शाखेच्या विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक कलाकारांपर्यंत सर्वांच्या सहभागाने कलेबाबत विचारमंथन सुरु झाले. व्हॉटसअ‍ॅप ग्रूपच्या माध्यमातून कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ उपलब्ध झाले. यातूनच ‘द पुणे आर्ट सोसायटी’ ची कल्पना पुढ आल्याचे कलाकार सुनील बलकवडे यांनी ‘लोकमत’शी बोलतना सांगितले. पुणे आर्ट फेस्टिवल या कार्यक्रमातून कलाकारांच्या या प्रयत्नाचा श्रीगणेशा होत आहे. सिनेमा, क्रिकेट, संगीत, साहित्याप्रमाणे रंगाचे भावविश्व रसिकांना श्रीमंत करेल, या भावनेतूनच सुमारे सव्वाशे कलाकार एकत्र येऊन रंगबेरंगी कलाकृतींचा खजिना रसिकांसाठी घेऊन येत आहेत. हा रंगांचा पहिला उत्सव १५, १६ आणि १७ एप्रिल रोजी बालगंधर्व कला दालनामध्ये साजरा होत आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ कलाकार सुधाकरण चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. यावेळी मान्यवर कलाकारांचे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. १६ एप्रिल रोजी बडोद्यातील कलाकार दीपक कन्नल ‘भारतातील कला चळवळ’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.--------------कलाकार वैयक्तिक कामातून कलेची साधना करत असतात. मात्र, कलेच्या क्षेत्रामधील विविध संधींचा एकत्रित अभ्यास करता यावा, विचारमंथन व्हावे, नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यादृष्टीने पुणे आर्ट सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीला शासनाकडून दर वर्षी अनुदान दिले जाते. पुणे आर्ट सोसायटीतर्फे पहिली दोन -तीन वर्षे भरीव काम करुन त्यानंतर शासनाशी संपर्क साधला जाणार आहे.- सुनील बलकवडे, कलाकार

टॅग्स :PuneपुणेBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरWhatsAppव्हॉट्सअॅप