वाद्य कारागीर पडद्यामागील कलाकार

By Admin | Updated: December 28, 2015 01:47 IST2015-12-28T01:47:24+5:302015-12-28T01:47:24+5:30

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाद्याचे स्थान अनन्यसाधारण असते. गायकाच्या बाबतीत तंबोरा जर सुरात लागला नाही तर त्याचे गाणे फुलू शकत नाही.

Artists next to the musical artist | वाद्य कारागीर पडद्यामागील कलाकार

वाद्य कारागीर पडद्यामागील कलाकार

पुणे : प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात वाद्याचे स्थान अनन्यसाधारण असते. गायकाच्या बाबतीत तंबोरा जर सुरात लागला नाही तर त्याचे गाणे फुलू शकत नाही. अशा वाद्यांची देखभाल करणाऱ्या वाद्य कारगीराचे स्थान संगीत क्षेत्रात महत्त्वाचे आहे. वाद्य कारागीर हे त्या मैफिलीतील पडद्यामागील कलाकर असतात, त्यांचा गौरव संगीताच्या व्यासपीठावर गौरव होणे महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. सुहास व्यास यांनी व्यक्त केले.
गानवर्धन आणि नलिनी छगन सुरा ट्रस्ट यांच्या वतीने पहिला वाद्य कारागीर पुरस्कार वाद्यदुरुस्ती क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुरुषोत्तम जोग यांना रविवारी प्रदान करण्यात आला. तसेच सरला कुलकर्णी स्मृती पुरस्कार भेंडीबाजार घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अनुराधा कुबेर यांना देण्यात आला. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या सोहळ्यात पं. व्यास यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. विवेक सुरा, गानवर्धनचे अध्यक्ष कृ. गो. धर्माधिकारी उपस्थित होते. व्यास म्हणाले, वादक किंवा गायक कोणताही असो त्यांच्या दृष्टीने वाद्य संवेदनशील असते. ते योग्य स्वरात लागणे यावर मैफिलीची यशस्विता अवलंबून असते, त्यामुळे अशा वाद्य कारागिराला पुरस्कार देणे उचितच आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ दर्शविणारा स्वर-साज-नक्षत्र हा कार्यक्रम या प्रसंगी झाला. दयानंद घोटकर, रमा कुलकर्णी, रश्मी मोघे, अजय ढमढेरे, पूर्वा घोटकर यांनी गीते सादर केली. गायनाबरोबरच वाद्यवृंदाच्या सुरावटींवर सादर झालेल्या गीतांनी कार्यक्रमात एक वेगळीच रौनक आणली. ‘सुहाना सफर और ये मौसम हसी’, ‘मेरी सपनो की रानी कब आयेगी तू’ ही इतर लोकप्रिये गीते वाद्यावर सादर करण्यात आली.
सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Artists next to the musical artist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.