शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कलाकारांचा ‘मसीहा’; पडद्यामागे राहून सहकार्याचा हात देत घडवित आहेत दानशूर वृत्तीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:31 IST

एकीकडे शासनाने कलाकारांना पोरकं केलेले असताना ‘ते’ मात्र कलाकारांचे ‘मसीहा’ बनले आहेत. श्रद्धानंद भोसले असे त्यांचे नाव. मूळ गाव सातारा.

ठळक मुद्देआजवर जवळपास १०० ते १५० कलाकारांना त्यांनी केली दोन लाखापर्यंतची मदत अ. भा. मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेला भोसले यांनी दिला ५० हजार रूपयांचा धनादेश

पुणे : नाटक, चित्रपटसृष्टीशी कोणताही संबंध नाही... केवळ वडिल शाहीर होते इतकाच काय तो कलेशी संबंध. परंतु दारात मदतीसाठी आलेल्या एकाही कलाकाराला परत न पाठविणे असा त्यांचा स्थायीभाव. प्रसिद्धीच्या फारसे मागे नसल्याने समाजाला त्यांचे नाव तितकेसे माहित नाही. मात्र पडद्यामागे राहून कलाकारांना सहकार्याचा हात देत आपल्या दानशूर वृत्तीचे दर्शन ते घडवित आहेत. एकीकडे शासनाने कलाकारांना पोरकं केलेले असताना ‘ते’ मात्र कलाकारांचे ‘मसीहा’ बनले आहेत. श्रद्धानंद भोसले असे त्यांचे नाव. मूळ गाव सातारा. वडिल हरिश्चंद्र सीताराम भोसले हे शाहीर होते. मुंबईमधून पदवी घेतल्यानंतर ते हॉटेलच्या व्यवसायात शिरले आणि त्यांनी परदेशामध्ये आपले चांगले बस्तान बसविले. ऑस्ट्रेलिया तसेच बंगळुरूमध्ये हॉटेल बिझनेस आणि सॉफ्टवेअर कंपनीचा त्यांचा व्यवसाय आहे. वडिलांमुळे कलाकारांशी त्यांचा जवळून संबंध आला. कलाकारांचे प्रश्न त्यांनी जवळून पाहिले असल्याने त्यांनी कलाकारांना मदतीचा हात दिला. मुंबईतच त्यांनी बूम कलाकार नावाची संस्था स्थापन केली. कलाकाराने त्यांच्याकडे मदतीची याचना केली तर ते त्या कलाकाराला परत पाठवित नाहीत, अशी त्यांची ओळख आहे. आजवर जवळपास १०० ते १५० कलाकारांना त्यांनी दोन लाखापर्यंतची मदत केली आहे. त्यांच्या संस्थेकडे नोंदणी केलेल्या प्रत्येक ज्येष्ठ कलाकाराला ते ७०० रूपयांची रक्कम खिशातून देतात. या दानशूर दात्याशी ‘लोकमत’प्रतिनिधीने संवाद साधला. ते म्हणाले, ज्या कलाकारांनी अनेक वर्षे रंगभूमीची सेवा केली, ते कलाकार आज विपन्नावस्थेत जगत आहे. कलाकारांच्या मदतीसाठी अनेकदा शासनाच्या काही व्यक्तींशी बोलणी केली मात्र प्रतिसाद शून्य मिळाला. मग स्वत: हूनच पुढाकार घेतला. त्यांना सहकार्य करणे हे आपले उत्तरदायित्व आहे असे वाटले. काम मिळत नसल्याने अनेक कलाकार व्यसनाच्या विळख्यात अडकले. या व्यसनापायी अनेकांची जीवनयात्रा संपली. त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी पनवेल येथे लवकरच मेडिटेशन सेंटर सुरू करणार आहे. त्याप्रमाणे कलाकारांना काही रक्कम मानधन म्हणून दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेला श्रद्धानंद भोसले यांनी ५० हजार रूपयांचा धनादेश दिला. परिषदेचे अध्यक्ष सुरेश देशमुख यांनी तो धनादेश स्वीकारला. 

टॅग्स :Puneपुणे