शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कलाकार, जादूगार ते तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:10 IST

कलाकार ,जादूगार ते तहसीलदार नृत्यदिग्दर्शक ... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन तहसीलदार असा वेगळा ...

कलाकार ,जादूगार ते तहसीलदार

नृत्यदिग्दर्शक ... जादूगार अन् काही वर्षांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देऊन तहसीलदार असा वेगळा आणि काहीसा खडतर प्रवास करून यश संपादन केले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला. शासकीय सेवेत रुजू होऊन आता समाजासाठी काम करता येईल असे अविनाश शेंबेटवाड या तरुणाला वाटले. परंतु, तहसीलदार म्हणून निवड होऊन तब्बल दहा महिन्यांचा कालावधी गेला, तरीही तो नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळेच स्पर्धापरीक्षा म्हणजे हमखास नोकरी, काही वर्षं प्रयत्न केले तर यश मिळेल, दुसऱ्याला सरकारी नोकरी मिळते, मग मला का नाही? केवळ असा वरवरचा विचार करून चालणार नाही. तर, प्रत्येकाने स्वत:चा प्लॅन ‘बी’ तयार ठेवला पाहिजे असे अविनाश पोटतिडकीने सांगतो.

नृत्य-अभिनयाची आवड असल्याने परफॉर्मिंग आर्ट क्षेत्रात करिअर करावे या उद्देशाने अविनाशने पुण्यात येऊन एफटीआयआयमध्ये प्रवेश घेण्याचे ठरवले. एफटीआयआयच्या प्रवेश पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू केला. परंतु, कॉलेज-गॅदरिंगचे डान्स बसवणे, नाटकाचा सेट उभा करणे या आवडीच्या कामातून उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार नव्हता. त्यामुळे मित्रांकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्याने स्पर्धापरीक्षांच्या तयारीला सुरुवात केली. अभ्यासात सातत्य ठेवले तर आपण यश मिळवू शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला. दोन वर्षे अभ्यास केल्यानंतर, राज्यसेवा परीक्षेतून तहसीलदार म्हणून त्याची निवड झाली. परंतु ,मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे अद्याप शासनाकडून नियुक्ती मिळाली नाही. त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना दर वर्षी अशा अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. सध्या स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आलेल्या अनुभवावर तो शॉर्टफिल्म तयार करत आहे. तहसीलदार म्हणून निवड होऊनही नियुक्ती मिळाली नाही. त्यामुळे काही वर्षांपूर्वी शिकलेली जादूची कला सध्या क्लोजप मॅजिनिशियन म्हणून सादर करून उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवतो. जादू नेमकी कशी केली जाते, याबाबत अंधश्रध्दा निर्मूलन समितीबरोबर काम करून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. स्पर्धापरीक्षेत अपयश येऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाकडे ‘प्लॅन बी ’ तयारच असला पाहिजे. अन्यथा, मिळालेल्या अपयशातून सावरणे कठीण जाते. त्यामुळे अभ्यास करताना शिक्षण सुरू ठेवून नेट-सेटसारख्या परीक्षा किंवा एखादा रोजगार, व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य आत्मसात केले पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून होणाऱ्या निवड प्रक्रियेबाबत अविनाश सांगतो, एमपीएससीने परीक्षा घेण्याचे वेळापत्रक कधीच पाळले नाही. त्यामुळे स्पर्धापरीक्षा म्हणजे मृगजळाच्या मागे धावणे असाच काहीसा प्रकार आहे. तसेच आपल्या नातेवाईकातील किंवा गावातील मुला-मुलीने स्पर्धा परीक्षेतून एखादे पद मिळवले. त्यामुळे त्याच्याभोवती निर्माण झालेले प्रसिध्दीचे वलय पाहून पुण्यात स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. परंतु, स्पर्धा परीक्षा म्हणजे टाईमपास नाही. घरच्यांचा दबावा आहे म्हणून निवडला स्पर्धापरीक्षांचा मार्ग. सर्वच या परीक्षांचा अभ्यास करतात आपणही करावा, हा वरवरचा विचार करून या क्षेत्राकडे येऊ नका, तर आपल्या अंतर्मनाला काय वाटते. परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांमध्ये आपण स्वत:ला सिध्द करू शकतो. अभ्यासात झोकून देण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची आपली तयारी आहे का? याचा विचार प्रत्येकाने करावा. तसेच या परीक्षांसाठी आयुष्यातील किती वर्षे द्यायची, याची सीमा प्रत्येकाने निश्चित करावी. स्वत:ची आणि स्वत:बरोबर आपल्या कुटुंबाची फरफट करून घेऊ नये. परंतु, यशस्वी होण्याची जिद्द ,त्याग, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही, हे ही तितकेच खरे असेही अविनाश सांगतो. शब्दांकन : राहुल शिंदे (वरिष्ठ बातमीदार, लोकमत, पुणे) --------------------